पुणे: कोंढव्याजवळ चार वाहनांचा विचित्र अपघात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

गोकूळनगर : कोंढवा-कात्रज रस्त्यावर खडीमशीन चौकाजवळ 4 ते 5 गाड्यांचा विचित्र अपघात झाला. टिळेकरनगरजवळ लोखंडी प्लेटा भरलेला ट्रेलरने धडक दिल्याने चार गाड्या एकमेकांना धडकल्या. यात डस्टर गाडी व्हिंटो कारवर आदळली. होंडा सिटी गाडीची व्हिंटो गाडीला मागून धडक बसल्याने चारही गाडांचे मोठे नुकसान झाले

गोकूळनगर : कोंढवा-कात्रज रस्त्यावर खडीमशीन चौकाजवळ 4 ते 5 गाड्यांचा विचित्र अपघात झाला. टिळेकरनगरजवळ लोखंडी प्लेटा भरलेला ट्रेलरने धडक दिल्याने चार गाड्या एकमेकांना धडकल्या. यात डस्टर गाडी व्हिंटो कारवर आदळली. होंडा सिटी गाडीची व्हिंटो गाडीला मागून धडक बसल्याने चारही गाडांचे मोठे नुकसान झाले

सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. पण येथील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी महानगरपालिका रस्ता कधी रूंद करणार असा प्रश्न आता स्थानिक नागरिक विचारू लागले आहेत. नेहमीच कात्रज कोंढवा रस्ता हा वाहतूक कोंडीनी जाम होत असतो.

आज सकाळी साडेअकराच्या सुमारास कात्रजकडून मंतरवाडीकडे जाणारा ट्रेलर (क्र. एम एच 46--एच1042) याने प्रथम इनोव्हा गाडीला धडक दिली. धडक एवढी जोरात होती की चार गाड्या एकमेकांना धडकल्या. त्यात डस्टर गाडी व्हिंटो गाडीवर आदळली. त्यामुळे कात्रज कोंढवा रस्त्यावरील वाहतूक एक तास विस्कळीत झाली होती. कोंढवा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन मोरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन क्रेनने वाहने बाजूला केली. त्यानंतर वाहतूक सूरळीत झाली. 

one or more people, car, sky, tree and outdoor

रस्ता रुंदीकरणाचे टेंडर पे टेंडर
कात्रज कोंढवा रस्ता रूंदीकरणाचे महानगरपालिकेचे हे पाचवे टेंडर असल्याची तक्रार नगरसेविका संगिता ठोसर यांनी केली. त्या म्हणाल्या ''गेली चार वर्षे आम्ही फक्त रस्ता रूंदीकरणाचे टेंडर ऐकत आहोत. टेंडरची पण आता तारीख पे तारीख अशी अवस्था महानगरपालिकेने झाली आहे. गेले चार वेळा हे टेंडर रद्द केले जाते. आता ही पाचवी वेळ आहे टेंडर उघडण्याची. आणखी किती बळी गेल्यावर, किती गाड्यांचे नुकसान झाल्यावर महानगरपालिका टेंडर पास करून रस्ता रूंद करणार आहे. असा प्रश्न उपस्थित केला. टेंडर रद्द का केले जाते याचा जाब आता आयुक्तांना विचारणार आसल्याचेही त्या म्हणाल्या.

1 person, car, sky and outdoor

Web Title: Strange accident due to trailer bang in Pune