मतदारांपर्यंत पोचण्यासाठी नवनवीन व्यूहरचना 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

पुणे - कसबा-सोमवार- मंगळवार-नाना- आणि रास्ता पेठेसह शहराच्या दाट लोकवस्तीतील प्रत्येक मतदारांपर्यंत पोचण्यासाठी कसबा- सोमवार या प्रभाग 16 (ड)मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार व गटनेते गणेश बिडकर यांनी नवनवीन व्यूहरचना आखली आहे.

पुणे - कसबा-सोमवार- मंगळवार-नाना- आणि रास्ता पेठेसह शहराच्या दाट लोकवस्तीतील प्रत्येक मतदारांपर्यंत पोचण्यासाठी कसबा- सोमवार या प्रभाग 16 (ड)मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार व गटनेते गणेश बिडकर यांनी नवनवीन व्यूहरचना आखली आहे.

पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीची आरती करून सोमवारी प्रचाराचा नारळ फोडला. 
महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांचे स्वतंत्र गट नेमत सर्व मतदारांपर्यंत पोचण्याच्या दृष्टीने प्रचारफेरी आणि पदयात्रांवर भर दिला आहे. सकाळी 9.30 ते दुपारी 2 आणि सायंकाळी 5 ते रात्री 10 अशा दोन टप्प्यांमध्ये हा प्रचार केला जात असून, अधिकाधिक मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. 

प्रभाग क्रमांक 16 (ब)मधील भाजपचे उमेदवार योगेश समेळ यांच्यासह बिडकर यांनी प्रचाराची व्यूहरचना आखली आहे; तर 16(क) मधील पक्षाच्या उमेदवार वैशाली सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यांची फौज नेमत अधिकाधिक महिलांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला आहे. सकाळच्या पहिल्या टप्प्यात सोमवार-मंगळवार पेठ; तर सायंकाळी कसबा पेठेत प्रचार सुरू आहे. 

बदललेल्या प्रभागरचनेत माझ्या प्रभागातही नव्याने मोठा परिसर समाविष्ट झाला असला, तरी माझ्या आजवरच्या विकासकामांमुळे मतदारांना मी परिचित आहे. भाजपचे शहरातील सर्वच उमेदवार शहरविकासाच्या समान मुद्द्यावर निवडणूक लढवत असल्याने महापालिकेत सत्ताबदल निश्‍चित आहे, असा विश्वास बिडकर यांनी व्यक्त केला.

Web Title: Strategy to reach out to new voters