पुणे | पोलिस आयुक्तालयात 'Street Dogs' चा धिंगाणा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

पोलिस आयुक्तालयात भटक्या कुत्र्यांमुळे दोन तासात चार पोलिस जखमी झाले. 

पुणे - भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने गुरूवारी पोलिस आयुक्तालयातील फौजदारासह चार पोलिस जखमी झाले. कुत्रे पकडण्यासाठी आयुक्तालयात धावपळ उडाली.

आयुक्तालयाच्या आवारात भटकी कुत्री मोकाट फिरत असतात. दुपारी दोनच्या सुमारास एका कुत्र्याने दोन पोलिस कर्मचाऱयांचा चावा घेतला. पोलिसांनी तातडीने कुत्र्याला हुसकावले. बाहेर जाता जाता आयुक्तालयातील सुरक्षा रक्षकासही कुत्रे चावले. 

दुपारी चारच्या सुमारास हेच कुत्रे पुन्हा आयुक्तालयाच्या कँटिन परिसरात आले. तेथे दुचाकी काढत असलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षकास ते चावले. संबंधित अधिकाऱयाला तातडीने ससून रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. याच दरम्यान तेथे दाखल झालेल्या महापालिकेच्या श्वान पथकाने कुत्र्याला पकडले. 

पुण्यातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

#StreetDogs
आपला अनुभव/सूचना कळवा फेसबूक, ट्विटरवर
ई मेल करा
 webeditor@esakal.com

Web Title: Stree tDogs bites police in Pune