#StreetDogs महापालिकेत सोडली कुत्र्यांची पिले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

पुणे - मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पतित पावन संघटनेने महापालिकेत कुत्र्यांची पिल्ले सोडून निषेध व्यक्त केला. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली. 

शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या उपाय योजनांवर सातत्याने टीका केली जात आहे. महापालिकेच्या सर्व साधारण सभेत नगरसेवकांनी प्रशासनावर जोरदार टीका केली होती. पालकमंत्री गिरीश बापट यांनीही कुत्र्यांवर केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेविषयी शंका उपस्थित केली होती. या पार्श्‍वभूमीवर पतित पावन संघटनेने महापालिकेतच कुत्री सोडून या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. संघटनेचे अध्यक्ष शिवाजी चव्हाण, पदाधिकारी मनोज नायर, श्रीकांत शिळीमकर, गोकुळ शेलार, दिनेश भिलारे आदींनी महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

Web Title: street dogs crime municipal