पथदिव्यांसाठी लाखोंची उधळपट्टी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

पुणे - आपल्या प्रभागाचा परिसर उजळविण्यासाठी नगरसेवक मंडळी गल्लीबोळात ‘दिवे’ लावून लाखो रुपयांची उधळपट्टी करीत असल्याचे उघडकीस आले आहे. सहकारनगरमध्ये तीन वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले विजेचे खांब काढून तेथेच नवे खांब बसविण्याची योजना याच भागातील नगरसेवकांनी राबविली. लोकांना विकासकामे दाखविण्याच्या स्पर्धेतून नगरसेवक अशी कामे करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिकेच्या उत्पन्नात गेल्या वर्षी पावणेदोन हजार कोटी रुपयांची तूट आली आहे. त्यामुळे या वर्षी अनावश्‍यक कामे न करता महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यावर भर राहील, असे महापालिका प्रशासनाने जाहीर केले होते.

त्यामुळे प्रभागांतील किरकोळ कामांवर पैशांची उधळपट्टी होणार नाही, अशी आशा होती. प्रत्यक्षात मात्र वस्तुस्थिती नेमकी उलट असल्याचे नगरसेवकांच्या कामांवरून आढळून आले आहे. सहकारनगरमधील नगरसेविका अश्‍विनी कदम यांच्या वार्डस्तरीय निधीतून २०१५ मध्ये विजेचे खांब उभारण्यात आले. त्यासाठी १५ लाख रुपये खर्चही केला. खांबांचा दर्जा पाहता आणखी सहा-सात वर्षे तरी, ते बदलण्याची आवश्‍यकता नाही. तरीही लाखो रुपये खर्चून खांब बदलले आहेत. त्यासाठी नगरसेवक महेश वाबळे यांनी पुढाकार घेतल्याचे महापालिकेच्या विद्युत विभागाने सांगितले.

सहकारनगरमधील चंद्रशेखर आझाद पथ, (कै.) वि. स. खांडेकर शाळेच्या परिसरात नवीन खांब उभारण्यात आले आहेत. जुने खांब काढून जागेवर ठेवण्यात आले आहेत. या खांबांची स्थिती पाहिली, तर नवे खांब बसविण्याची गरज नसल्याचे जाणवते. मात्र, निधी संपविण्याच्या प्रयत्नात ही कामे करण्यात आल्याचे दिसून आले आहे.  अश्‍विनी कदम म्हणाल्या, ‘‘या भागात तीन वर्षांपूर्वी बसविलेल्या खांबांची स्थिती चांगली होती. मात्र, निधी संपविण्यासाठीच ही कामे केली आहेत.’’ नगरसेवक महेश वाबळे म्हणाले, ‘‘१९८७ मध्ये बसविलेले खांब बदलले आहेत. मात्र, काही खांब सात वर्षांपूर्वीचे होते. केवळ राजकीय वादातून खोडा घातला जात आहे.’’

Web Title: Street Light Issue loss