#StreetDogs  भटक्‍या कुत्र्यांपेक्षा माणसांचा जीव महत्त्वाचा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

दररोज शेकडो-हजारो कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या (खाण्यासाठी) मारल्या जातात; पण कुत्र्यासारख्या उपद्रवी, धोकादायक प्राण्याबाबतच एवढा कळवळा का? कॉर्पोरेशनचे हात कायद्याने बांधले असतील, तर नागरिकांनीच हडपसरसारखे प्रयोग करून स्वतःचा जीव वाचवला पाहिजे.
- अरुण द. पोटे.

कुत्राप्रेमी मंडळींचे डोळे कधी उघडणार? भटक्‍या कुत्र्यांनाही प्रेमाने बिस्किटे खाऊ घालून त्यांची पिलावळ वाढविणे हेच यांचे काम. नसबंदी हा काही परिणामकारक उपाय नव्हे. नसबंदी केलेली कुत्री चावण्याचा गुणधर्म नसबंदीमुळे सोडतील, असं त्यांना वाटतं का?  
- डॉ. कमलाकर क्षीरसागर

भटकी कुत्री गोळा करून ठेवायला जमीन द्यावी. प्राणिप्रेमी व सरकारी यंत्रणांनी एकत्र येऊन त्यांची देखभाल करावी. प्राणिप्रेमींनी प्रत्येकी एक कुत्रे सांभाळावे. सरकारी आदेशामुळे कुत्री पकडण्यात येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात. प्राणिप्रेमींनी माणूस या प्राण्यावरही प्रेम दाखवावे व त्यांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करावे. 
- मंगला फडके

गोरगरिबांच्या, मुलाबाळांच्या जिवावर उठलेल्या कुत्र्यांचा जीव वाचवण्यासाठी जिवाचा आटापिटा करू नये. श्‍वानप्रेमींना हे गैर वाटत असेल, तर त्या भागातील श्‍वानप्रेमी संघटनांनी कुत्र्यांसाठी घरे बांधावीत. त्यात ही कुत्री ठेवावीत आणि आपल्या घरून त्यांच्यासाठी जेवणाचे डबे पाठवावेत. 
- मिलिंद श्रीखंडे

सर्वच शहरांत भटक्‍या कुत्र्यांनी गोंधळ माजविला आहे. रात्रीच्या वेळी वाहनांच्या मागे धावून वाहनचालकांना ती घाबरवून सोडतात, प्रसंगी चावतात. सर्व शहरांतील कुत्र्यांचा न मारता कसा बंदोबस्त करता येईल, याचा विचार महानगरपालिका व कॅंन्टोन्मेंट बोर्ड यांनी लवकरात लवकर करावा. 
- प्रदीप सातनकर

पिसाळलेल्या कुत्र्यांना औषधोपचाराची गरज आहे. स्थानिक पातळीवरील शासकीय यंत्रणांनी याबाबत जातीने लक्ष द्यायला हवे. त्याचबरोबर एक नागरिक म्हणून आपलीही जबाबदारी आहे की जर कुणी कुत्रा अशा अवस्थेत असेल, तर त्याची माहिती स्थानिक नगरसेवक, यंत्रणा यांना कळवावी. 
- अमित मेहर

भुजबळ टाऊनशिप, काशीकापडी पूरम, कोथरूड येथील १०-१२ भटक्‍या कुत्र्यांची तक्रार महापालिकेकडे केली होती. यावर कारवाई न करता कुत्र्यांचे नसबंदी ऑपरेशन झाले आहे, असे सांगून विषय बंद करण्यात आला. या उपर काही तक्रार असेल, तर कोर्टात तक्रार करा, असा सल्लाही देण्यात आला. महापालिका अधिकारी आपले काम कधी नीट करणार? या परिस्थितीला तेच जबाबदार आहेत. 
- अभिजित सोमण

वेडा कुत्रा ६ लोकांना चावल्याबद्दलची बातमी वाचली. हे खरंच एक भयानक प्रकरण आहे आणि भविष्यात अशी घटना थांबविण्यासाठी महापालिकेने कडक कारवाई केली पाहिजे. भटक्‍या कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीच वापरली जाऊ शकते. भटक्‍या कुत्र्यांपेक्षा मनुष्याचा जीव महत्त्वाचा आहे. 
- रवींद्र जवळे

Web Title: #StreetDogs  Human beings are more important than StreetDogs