#StreetDogs  रेबीज प्रतिबंधक लस गरजेची

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

पुणे - शहरातील कुत्रे चावल्याच्या घटनांमध्ये वेगाने वाढ होत असल्याने लहान मुलांना रेबीज प्रतिबंधक लस घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. पाळीव कुत्रे असलेल्या घरातील सर्वांनी ही लस घेतली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. कुत्रे चावण्याआधी रेबीज प्रतिबंधक लस घेणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. 

शहरात रेबीजने चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच चार हजार ६४१ रुग्णांना कुत्रे चावल्याची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागात झाली आहे. त्या पाशर्वभूमीवर हा सल्ला देण्यात येत आहे.

भारती विद्यापीठ रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय ललवाणी म्हणाले, ‘‘रेबीज विरुद्ध ही प्रतिबंधक लस अत्यंत प्रभावी ठरते. पाळीव कुत्री असलेल्यांनीही ही लस घेणे आवश्‍यक आहे. विशेषतः लहान मुलांना तर ही दिली पाहिजे. रेबीजचे इंजेक्‍शन दिलेले पाळीव कुत्रे चावल्यास आपल्याला इंजेक्‍शन घ्यावे लागत नाही, असा एक गैरसमज दिसतो. परंतु या लसीने माणसांना रेबीजचा शंभर टक्के प्रतिबंध होत नाही. कुत्रे चावल्यावर फक्त लसीबरोबरच इम्युनोग्लोबुइन हे रेबीजच्या जंतूंविरोधात लगेच लढणारे प्रतिजैविकही देणे आवश्‍यक असते. रेबीज प्रतिबंधक लस दिली असल्याने इम्युनोग्लोबुइन द्यावे लागत नाही.’’

रेबीज आजाराचा संसर्ग प्राण्यांमधून मनुष्यांमध्ये होतो. दरवर्षी भारतात २० हजार लोक या आजारामुळे  दगावतात. यात ४० टक्‍के ही १५ वर्षांखालील मुले असतात, असेही त्यांनी सांगितले.

हे लक्षात घ्या...
लहान मुलांना बऱ्याचदा प्राण्यांची आवड असते व भीती नसते
कुत्रा चावला, तर घाबरून मुले पालकांना सांगत नाहीत
मुले आपलं संरक्षण करण्यात तेवढी सक्षम नसतात
त्यांची उंची कमी असते, त्यामुळे कुत्री त्यांना सहज चावू शकतात. 

Web Title: #StreetDogs Need anti rabies vaccine

टॅग्स