दूध भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार - अजित पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar and Raju Shetty

बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी रविवारी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात शेट्टी आणि पवार एकाच व्यासपीठावर होते.

दूध भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार - अजित पवार

सोमेश्वरनगर - ‘नाही म्हटले तरी राज्यकारभार तुम्हीच चालवताय. मुख्यमंत्री कधीमधीच दिसतात. तुम्ही नेहमी उपलब्ध होणारे, भेटणारे आहात; म्हणून सांगतो दूध भेसळखोरांवर (Milk Mixing) कडक कारवाई (Crime) करा,’ अशा शब्दात माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना चिमटा काढत अजित पवार (Ajit Pawar) यांचे कौतुक केले. यावर अजित पवार यांनीही बालकांच्या आयुष्याशी खेळणाऱ्यांबाबत टोकाची भूमिका घेतली जाणार असल्याचे सांगत शेट्टी यांच्या विधानास प्रतिसाद दिला.

बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी रविवारी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात शेट्टी आणि पवार एकाच व्यासपीठावर होते. या वेळी दोघांनीही एफआरपीबाबत चकार शब्द काढला नाही. उलट पवार यांनी लोकशाहीत राजकीय मतभेद असू शकतात. संविधानाने प्रत्येकास विचारस्वातंत्र्य दिले असल्याचे सांगत शेट्टींच्या मतभेदांबाबत आपली भूमिका मांडली.

बिबट सफारी जुन्नर आणि बारामतीलाही

गेल्या काही दिवसांत समाज माध्यमात बिबट सफारी ‘बारामती’ला पळविली अशी चर्चा सुरू असल्याबाबत पवार म्हणाले, ‘बिबट सफारी जुन्नरलाही होईल आणि बारामतीलाही होईल.’

Web Title: Strict Action Taken Against Those Who Adulterate Milk Ajit Pawar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..