Pune ताडी-विक्री व्यवसायिकांविरुद्ध प्रशासनाकडून कडक कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Strict action toddy-selling businessmen

बारामतीत दोन युवकांच्या मृत्यूस कारणीभूत ताडी-विक्री यासाठी निषेध मोर्चा 

Pune : ताडी-विक्री व्यवसायिकांविरुद्ध प्रशासनाकडून कडक कारवाई

माळेगाव : माळेगाव बुद्रुक (ता. बारामती)  येथे अवैद्य ताडी विक्री, गावटी दारू विक्री प्रकरणातील आरोपींवर तातडीने कारवाई व्हावी, या पार्श्वभूमीवर येथील सामाजिक कार्यकर्ते व गावकऱ्यांनी आज निषेध मोर्चा काढला. गावातील अवैध धंदे कायमचे बंद झालेच पाहिजे आदी घोषणा देत मोर्चेकर्‍यांनी गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.

विशेषतः विषारी ताडी पिल्याने माळेगावातील भटक्या समाजातील दोन युवकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. राजू लक्ष्मण गायकवाड ( वय 35 ), हनुमंता मारुती गायकवाड (वय40, दोघे रा. चंदननगर,  माळेगाव बुद्रुक ता.बारामती ) हि मयत युवकांची नावे आहेत. या प्रकरणाचे पडसाद आजच्या मोर्चामध्ये स्पष्टपणे दिसून आले. मोर्चेकर्‍यांमध्ये कार्यकर्ते मच्छिंद्र टिंगरे, अविनाश भोसले , रामभाऊ वाघमोडे , विक्रम कोकरे,  संतोष वाघमोडे,  विश्वास मांढरे , आशाताई नवले, अशोक सस्ते, अंजूताई वाघमारे, कल्पना जगताप, माया चव्हाण आदी पदाधिकाऱ्यांनी निर्णय भूमिका घेतली.

माळेगावतील दोन युवकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ताडी-विक्री व्यवसायिकांविरुद्ध कडक कारवाई व्हावी, ताडी तयार करण्यासाठी रसायन पुरवठा करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करा, गावातील अवैद्य व्यवसाय पूर्णतः बंद करण्यासाठी जुजबी कारवाई उपयोगाची नाही तर त्या प्रकरणात तडीपारी कारवाई झाली पाहिजे, एक्साईज इन्स्पेक्टरवर कारवाई झाली पाहिजे, आदी मागण्यांच्या पार्श्वभूमीवर वरील पदाधिकाऱ्यांनी निर्णय भूमिका घेतली.

मोर्चेकरांची निवेदन स्वीकारण्यासाठी बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे उपस्थित होते, तर कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचार यांनी चोक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. 

मृत्युमुखी पडलेल्यांना तावरे यांची आर्थिक मदत…

माळेगाव बुद्रुक येथील चंदन नगर परिसरातील भटक्या समाजातील दोन युवकांनी विषारी ताडीचे सेवन केल्याने नुकतेच मृत्यूमुखी पडले होते. अर्थात संबंधितांचे कुटुंबीय उघड्यावर आल्याने त्यांच्या पुनर्वसनासाठी माळेगावचे कार्यकर्ते रविराज तावरे यांनी दोन्ही कुटुंबाला सुमारे 22 हजार रुपयांचे आर्थिक मदत केली. तसेच एसपी सराफ यांच्या वतीने पाच हजार रुपये मदत झाली, याशिवाय जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे प्रमोद जाधव यांच्या वतीने संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत संबंधित निराधार कुटुंबीयांना शासन स्तरावर मदत मिळवून देण्याचा प्रयत्न होत आहे.