CoronaVirus
CoronaVirus

प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी - नितीन करीर

पुणे - कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी, आरोग्य तपासणी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि आवश्यकतेनुसार क्वारंटाईन करण्यावर भर द्यावा, असे निर्देश महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांनी दिले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

करीर यांनी बुधवारी शहरासोबतच पुणे विभागातील कोरोना प्रतिबंधाबाबतचा आढावा घेतला. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, श्रावण हर्डीकर आदी या वेळी उपस्थित होते.

करीर म्हणाले, पावसाळ्यात विविध प्रकारचे आजार वाढण्याची शक्यता असते. या आजारांची आणि कोरोनाची लक्षणे सारखी असल्यामुळे जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. महापालिका आणि सरकारी रुग्णालये ही कोविड-19 रुग्णालये म्हणून राखून ठेवण्यात आलेली आहेत. पावसाळ्यातील आजारासंदर्भात खासगी रुग्णालयांची भूमिका जास्त महत्त्वाची आहे. पावसाळ्यात रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन कोरोनासाठी  निर्माण करण्यात आलेल्या तीन स्तरांवरील रुग्णालयीन व्यवस्थेत आवश्यकतेनुसार खाटांची क्षमता निर्माण करण्यावर भर द्यावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com