दहावीच्या निकालाची कार्यपद्धती काटेकोर पाळा; फेरफार झाल्यास कारवाई

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल तयार करताना राज्य सरकारने जाहीर केलेल्या अंतर्गत मूल्यमापन कार्यपद्धतीचा काटेकोर अवलंब शाळांना करावा लागणार आहे.
Exam
ExamSakal

पुणे - इयत्ता दहावीच्या (SSC Result) विद्यार्थ्यांचे (Student) निकाल तयार करताना राज्य सरकारने (State Government) जाहीर केलेल्या अंतर्गत मूल्यमापन कार्यपद्धतीचा काटेकोर अवलंब शाळांना (Scholl) करावा लागणार आहे. कार्यपद्धतीचे उल्लंघन केल्यास अथवा निकालाच्या दस्तावेजात फेरफार केल्यास संबंधित शाळा, किंवा व्यक्तींवर कठोर कारवाई (Crime) केली जाणार असल्याचे संकेत शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. (Strictly Follow the Procedure of SSC Result Action in Case of Change)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा यंदा रद्द केली आहे. दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे लागणार असून त्याची कार्यपद्धती नुकतीच जाहीर झाली आहे. अंतर्गत मूल्यमापनाच्या लागणाऱ्या निकालात अधिकाधिक वस्तुनिष्ठपणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने कठोर पावले उचलली आहेत.

Exam
परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शहरात या ठिकाणी होणार कोव्हिशील्डचे लसीकरण

शाळा स्तरावर निकाल समिती कार्यान्वित केली जाणार असून त्याच्या कामकाजाची नियमावली निश्चित केली आहे. यामध्ये इयत्ता नववीच्या वार्षिक मूल्यमापनाचे अभिलेख आणि दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या संदर्भातील सर्व अभिलेख, संबंधित उत्तरपत्रिका व इतर बाबी निकाल समितीच्या पडताळणीनंतर सीलबंद करून मुख्याध्यापकांच्या ताब्यात ठेवावे लागणार आहेत. हे अभिलेख अठरा महिने जतन करायचे आहेत. दरम्यान आवश्यकतेनुसार क्षेत्रीय अधिकारी किंवा पथकास पडताळणीसाठी ते उपलब्ध करून द्यावे लागणार आहे.

अशी होईल कार्यवाही...

  • सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या शाळा, व्यक्ती, समितीवर कारवाई होईल

  • मंडळ मान्यता, मंडळ सांकेतांक काढून घेण्यात येईल

  • कार्यपद्धतीचे उल्लंघन, दस्तऐवजात फेरफार अथवा गैरप्रकार व अनियमितता केल्यास दोषींवर शिस्तभंग किंवा आर्थिक दंडात्मक कारवाई होईल

  • गैरप्रकार व अनियमिततेचे स्वरूप पाहून शाळेतील विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवणे, रद्द करणे याचा निर्णय मंडळ घेईल

  • एक किंवा अधिक प्रकारची कारवाई करण्याचे अधिकार संबंधित सक्षम प्राधिकरणास असतील

गुण पडताळणी

विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या संदर्भातील मूल्यमापन नोंदपत्रके, आवश्यक अभिलेख व इतर बाबी यांची तपासणी पडताळणी मंडळाकडून व शालेय शिक्षण विभागातील क्षेत्रीय अधिकारी, पथकांमार्फत करण्यात येणार आहे. शाळांनी संगणक प्रणालीमध्ये विद्यार्थीनिहाय भरलेल्या गुणांच्या नोंदी व शाळेकडे उपलब्ध असलेल्या अभिलेखातील प्रत्यक्ष गुण यांची पडताळणी करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी अध्यादेशात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com