पुणे - केडगाव परिसरात बंद शांततेत

रमेश वत्रे
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

केडगाव (पुणे) : धनगर समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी केडगाव (ता.दौंड) परिसरात पुकारलेला बंद शांततेत पार पडला. बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. केडगाव, बोरीपार्धी, वाखारी, दापोडी, खोपोडी, देऊळगावगाडा या गावांमध्ये दुपारपर्यंत कडकडीत बंद पाळण्यात आला. आंदोलनकर्त्यांच्यावतीने यवतचे पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

केडगाव परिसरातील युवक कार्यकर्त्यांनी काल बंदच्या संदर्भात बैठक घेतली होती. या बैठकीत शांततेत बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. सकाळी परीसरातील युवकांनी भंडारा उधळत दुचाकीवरून रॅली काढली. यावेळी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. रॅलीतील युवकांनी केडगाव ग्रामपंचायत कार्यालयापुढे व चौफुला येथील उड्डाणपुलावर सभा घेऊन आरक्षणाबाबतची भूमिका विषद करण्यात आली. धनगर समाज वेगळे आरक्षण मागतच नाही.

समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांनी समावेश केलेला आहे. फक्त त्याची अंमलबाजवणी करणे बाकी आहे. यासाठी भाजप-शिवसेनेसह या आधीच्या सर्वच सरकारांनी यात समाजाला खेळवत ठेवले आहे. असा मुद्दा युवकांनी आपआपल्या भाषणात मांडला. भीमा पाटस कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात यांनी पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांना निवेदन दिले. यावेळी परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

Web Title: strike is in piece in kedgao in pune