'एक मराठा, लाख मराठा'च्या घोषणांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणला

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 September 2020

मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. मराठा समाजातील महिला- पुरुषांनी हातात भगवे आणि काळे झेंडे घेऊन आंदोलन केले. 

पुणे : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. जय जिजाऊ जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. मराठा समाजातील महिला- पुरुषांनी हातात भगवे आणि काळे झेंडे घेऊन आंदोलन केले. 
 

Maratha Kranti Morcha muslim sanghatana
मराठा आरक्षणाच्या मागणीला मुस्लिम संघटनेचा पाठिंबा

पुण्याच्या या दोन प्राध्यापकांचा विश्‍वेश्‍वरय्या उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने गौरव 

मराठा समाजातील मुलांना शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षण देण्यात यावे, आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवण्यात यावी, सारथी संस्थेला निधी उपलब्ध करून द्यावा, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परतावा योजनेचा लाभ द्यावा, एईसीबीसी विद्यार्थ्याना आर्थिक सवलती सुरू ठेवाव्यात अशा विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले. मुस्लिम समाज संघटनेच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला.

maratha Kranti morcha Bhim army
मराठा आरक्षणाच्या मागणीला भीम आर्मी पाठिंबा

अंतिम वर्ष परीक्षेच्या नियोजनात विद्यापीठांची मनमानी थांबवा; उपसभापती डॉ. गोऱ्हे यांचे निर्देश


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Strong protests on behalf of Maratha Kranti Morcha in front of the Pune Collectors Office