हुतात्मा बाबू गेनू यांच्यामुळेच स्वातंत्र्याचा लढा गतिमान झाला : दिलीप वळसे पाटील 

डी.के.वळसे पाटील 
बुधवार, 12 डिसेंबर 2018

र : "देशभक्त हुतात्मा बाबू गेनू मुंबई येथे गिरणीत कामाला होते. पण मनात स्वातंत्र्याचा सतत ध्यास होता. १९३० मध्ये वडाळा येथे झालेल्या सत्याग्रहात त्यांना सक्तमजुरीची शिक्षा झाली होती. शिक्षा भोगून परतताच मुंबईत विदेशी कपड्याच्या बंदीची चळवळीत ते सक्रीय झाले. त्यांनी विदेशी कपडे घेऊन अडवला. उद्दाम इंग्रजी चालकाने त्यांच्या अंगावरून ट्रक पुढे नेला. बाबु गेनूंना हौतात्म्य लाभले. त्यानंतरच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा लढा गतिमान झाला.'' असे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. 

मंचर : "देशभक्त हुतात्मा बाबू गेनू मुंबई येथे गिरणीत कामाला होते. पण मनात स्वातंत्र्याचा सतत ध्यास होता. १९३० मध्ये वडाळा येथे झालेल्या सत्याग्रहात त्यांना सक्तमजुरीची शिक्षा झाली होती. शिक्षा भोगून परतताच मुंबईत विदेशी कपड्याच्या बंदीची चळवळीत ते सक्रिय झाले. त्यांनी विदेशी कपडे घेऊन अडवला. उद्दाम इंग्रजी चालकाने त्यांच्या अंगावरून ट्रक पुढे नेला. बाबु गेनूंना हौतात्म्य लाभले. त्यानंतरच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा लढा गतिमान झाला.'' असे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. 

मुंबई परेल येथे बुधवारी (ता.12) हुतात्मा बाबू गेनू यांच्या बलिदान स्थळी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वळसे पाटील यांनी अभिवादन केले. त्यांच्या समवेत बबनराव कानोजे, परेल व आंबेगाव तालुक्यातील मुंबई रहिवासी यांच्यासह अनेक मान्यवर होते. 

वळसे पाटील म्हणाले, " हुतात्मा बाबू गेनू हे माझ्या आंबेगाव- शिरूर विधानसभा मतदार संघातील महाळुंगे पडवळ गावचे आहेत. शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या बाबू गेनू यांनी निर्माण केलेला इतिहासाचा सार्थ अभिमान आंबेगाव तालुक्यातील जनतेला आहे. त्यांच्या देश प्रेमाचा तरुण पिढीसमोर आदर्श आहे.'' 
 

Web Title: the struggle for independence got accelerated due to martyr Babu Genu, : Dilip Walse Patil