जिद्दीला मिळावी शासकीय धोरणांची साथ

साखर संकुल, पुणे - परिसंवादात मार्गदर्शन करताना राजेंद्र साबळे. सोबत शेतकरी व अधिकारी.
साखर संकुल, पुणे - परिसंवादात मार्गदर्शन करताना राजेंद्र साबळे. सोबत शेतकरी व अधिकारी.

पुणे - शेतकरी गट व त्यातून शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करण्याच्या प्रक्रियेत असलेल्या शेतकरी प्रतिनिधींना जाणवणाऱ्या समस्यांना कशा पद्धतीने सामोरे जावे आणि एफपीसीच्या छत्राखाली शेतकऱ्यांचे बाजाराभिमुख संघटन करण्यासाठी सरकारने काय धोरणात्मक बदल करावेत, याविषयी कौशल्य कार्यक्रमांद्वारे शेतकऱ्यांच्या अपेक्षा जाणून घेणारा परिसंवाद बुधवारी साखर संकुलात आयोजिला होता. 

महाराष्ट्र कौशल्य विकास सोसायटी, आत्मा विभाग, सिमॅसिस लर्निंग एलएलपी आणि पॅलेडियम कन्सल्टिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडतर्फे आयोजित परिसंवादात संस्थात्मक उभारणी, वित्त पुरवठा, मार्केटिंग, ब्रॅंडिंग व व्यवसाय विकास, विस्तार, शाश्‍वत विकास आदी मुद्‌द्‌यांवर चर्चा झाली. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील शेतकरी तसेच कृषी, पशुसंवर्धन, कौशल्य विकास, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, नाबार्डचे अधिकारी उपस्थित होते. 

कौशल्य कार्यक्रमात गटशेतीला चालना देऊन गटशेती प्रवर्तक तयार करण्यावर भर आहे. यातून समविचारी गट स्थापून पुढील टप्पा शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करणे असा आहे. या कंपनीसाठी कागदपत्रांची पूर्तता करणे, वित्त पुरवठा, मार्केटिंगच्या नियोजनात येणाऱ्या समस्यांवर काय उपाययोजना करता येईल यावर चर्चा झाली. आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे, उपसंचालक सुभाष घाडगे, पॅलेडियमच्या संचालक बार्बरा स्टॅन्कोव्हिकाव्हो, जॉन काबेजास, कौशल्य विकास सोसायटीचे अभियान समन्वयक संतोष राऊत, कौशल्य अभियान अधिकारी गजानन जगाते उपस्थित होते. पॅलेडियमचे राकेश गांगुली यांनी प्रास्ताविक केले. अमित जोशी यांनी सादरीकरण केले. जयप्रकाश कुलकर्णी यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com