वैद्यकीय-अभियांत्रिकी प्रवेश परिक्षेचा अभ्यासात विद्यार्थ्यांबरोबर पालकांची भूमिकाही महत्वाची - प्रा अमित नवले

मिलिंद संधान
रविवार, 8 एप्रिल 2018

सकाळ विद्या व सप्तर्षी कोचिंग इन्सिट्युट यांच्या संयुक्त विद्यमाने अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी मार्गदर्शनपर चर्चासत्राचे नटसम्राट निळुभाऊ फुले नाट्यगृहात नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

नवी सांगवी - "अभियांत्रिकी अथवा वैद्यकीय प्रवेश परिक्षांमध्ये केवळ सीबीएससी बोर्डाच्याच अभ्यासक्रमाला प्राध्यान्य दिले असते व आपल्या महाराष्ट्र बोर्डाचा अभ्यासक्रम नगन्य असतो, अशा शंका मनातून काढून टाका. त्यामुळे कोणतेही बोर्ड तुमच्या अभियांत्रिका अथवा वैद्यकीय प्रवेशावर परिणाम करू शकत नाही." असे उद्गार प्राध्यापक अमित नवले यांनी पिंपळे गुरव येथे काढले. सकाळ विद्या व सप्तर्षी कोचिंग इन्सिट्युट यांच्या संयुक्त विद्यमाने अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी मार्गदर्शनपर चर्चासत्राचे नटसम्राट निळुभाऊ फुले नाट्यगृहात नुकतेच आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थित पालक व विद्यार्थ्यांसमोर प्राध्यापक नवले यांनी आपले विचार मांडले. यावेळी व्यासपिठावर सप्तर्षीच्या संस्थापक संचालिका शिल्पा नवले, दैनिक सकाळचे जाहिरात विभाग मुख्य व्यवस्थापक मिलिंद भुजबळ, वितरण विभाग वरिष्ठ व्यवस्थापक विनोद पाटील उपस्थित होते.

प्राध्यापिका शिल्पा नवले यांनी वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेश करताना जेईई, नीट, सीईटी प्रवेश परिक्षांना विद्यार्थ्यांना सामोरे जात असताना बारावी परिक्षांचे बदललेले स्वरूप तसेच सीईटी, जेईई परीक्षापध्दती व अभ्यसाक्रम यातील नेमका फरक व सीबीएससी व राज्य बोर्डाची निवड कशी करावी याबद्दलचे सखोल मार्गदर्शन सोप्या शब्दात दिले. तसेच जईई मेन व अँडव्हान्स, बीटसँट, व्हिआटी ट्रिपल ई, आयसर, नीट, एआयआयएमएस, जेआयपीएमईआर या सर्व प्रवेश परिक्षांची माहिती त्यांनी दिली. प्रवेश परिक्षेत यशस्वी होण्याकरीता पुढील दोन वर्षात लक्ष विचलित न करता स्वतःवर काही चांगली बंधने घालुन संपुर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रीत केल्यास यश तुमचेच आहे असेही त्यांनी सांगितले.

प्राध्यापक अमित नवले म्हणाले, "विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका महत्वाची ठरते. पाल्याला प्रोत्साहित करणे, अवघड व निर्णायक परिस्थितीत त्याला आधार देणे आणि सर्वात म्हणजे घरातील वातावरण आनंददायी ठेवणे. अकरावीत विज्ञान शाखेत प्रवेश घेताना मुलाला येण्याजाण्यास सोयीचे ठरलेल्या महाविद्यालयातच प्रवेश घ्यावा. हा जर शालेय शिक्षण इंग्रजी माध्यमात झाले असेल तर इंग्रजी बेस असलेले महाविद्यालय निवडण्यास काही हरकत नाही."

आपण जसे सण, उत्सव साजरे करतो त्याच धर्तीवर 'सेलिब्रेट सायन्स' ही अनोखी संकल्पना प्रा. शिल्पा नवले न्यूटच्या नियमाचे उदाहरण देऊन मांडली. न्यूटनचे नियम वाचता येणं, ते समजणं आणि समजल्यावर परिक्षेमध्ये त्यावर विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तर देणे हे सेलिब्रेशनच होय. त्याचा प्रत्येक गुण विद्यार्थांना त्यांच्या ड्रीम करीयर जवळ नेण्यास मदत करतो.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

 

Web Title: Student and Parents Roll Important While Studying Mediacal and Engineering