विद्यार्थ्यांनी अनुभवले सैनिकी प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

सकाळ माध्यम समूहाच्या ‘एनआयई’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी सुटीत विविध कार्यशाळा व क्षेत्रभेटीचे आयोजन केले होते. यात विद्यार्थ्यांनी कला कौशल्यासोबत सैनिकी शाळेस भेट देत सैनिकी प्रशिक्षणाचा अनुभव घेतला.

पुणे - सकाळ माध्यम समूहाच्या ‘एनआयई’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी सुटीत विविध कार्यशाळा व क्षेत्रभेटीचे आयोजन केले होते. यात विद्यार्थ्यांनी कला कौशल्यासोबत सैनिकी शाळेस भेट देत सैनिकी प्रशिक्षणाचा अनुभव घेतला.

पुणे व पिंपरी चिंचवड येथे केतकी पिंपळखरे, मानसी महाजन व संतोष चोरडिया यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. रंगीबेरंगी कागद, रंग व ‘क्‍ले आर्ट’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पेनस्टॅन्ड, बुकमार्क व पॉप अप कार्ड बनविले. कासार आंबोली (ता. मुळशी) येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेस क्षेत्र भेट दिली. विद्यार्थ्यांनी सैनिकी प्रशिक्षणाची माहिती घेतली. शाळा व परिसराची माहिती पर्यवेक्षक शाम नांगरे व संदीप पवार यांनी दिली. 

वॉल क्‍लायबिंग, ऑबस्टॅकल्स, रायफल शूटिंग, धनुर्विद्या यांची माहिती भाऊसाहेब मार्तंड, रविराज थोरात, प्रशांत जोशी, गजानन माळी, श्रीराज चव्हाण यांनी दिली. बावधन येथील रेस्क्‍यू या सामाजिक संस्थेच्या नेहा ओसवाल, अक्षता पारेख, वरुण वेंकीट व अमन जोशी यांनी कुत्रा व अन्य प्राण्यांच्या हल्ल्यापासून संरक्षण व हल्ला झाल्यास प्रथमोपचाराबाबत मार्गदर्शन केले. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री शिंदे, अनंत कुलकर्णी, मंजिरी पाटील, प्रमोद झुरमुरे, गजानन पाटील, शिक्षण प्रसारक मंडळीच्या इंग्रजी माध्यम शाळेच्या (निगडी) मुख्याध्यापिका लीना वर्तक, रंजना चौधरी उपस्थित होते. भोसरी येथील एम टेक इंजिनिअर्स हे प्रायोजक होते. ‘‘पालकांनी अशा उपक्रमांसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले पाहिजे. विद्यार्थ्यांचा आत्मविश्‍वास  वाढण्यास मदत होते,’’ असे एम टेक इंजिनिअर्सचे मनीष कोल्हटकर व मंदार किराणे म्हणाले.

Web Title: Student Army Training Sakal NIE