पेपरफुटीप्रकरणी विद्यार्थ्याला अटक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या पेपरफुटीप्रकरणी शनिवारी रात्री उशिरा एमआयटी महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याविरुद्ध कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित विद्यार्थ्यास पोलिसांनी अटक केली. विद्यापीठाच्या तपास पथकाने पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा आदेश दिल्यानंतर एमआयटी महाविद्यालयाने विद्यार्थ्याविरुद्ध फिर्याद दाखल केली. 

आदर्श रवींद्रन (वय 21, मूळ रा. केरळ) असे अटक केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी प्राचार्य ललित खंडेराव क्षीरसागर यांनी फिर्याद दिली आहे. 

दरम्यान, विद्यापीठाच्या तपास पथकाच्या तपासणीमध्ये एमआयटी महाविद्यालयातील आदर्श आढळून आला होता. पथकाने त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने हा प्रकार केल्याचे कबूल केले होते. दरम्यान विद्यापीठ प्रशासनाने त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्याचा आदेश एमआयटीला दिला होता. त्यानुसार प्राचार्य क्षीरसागर यांनी फिर्याद दिली. त्यानंतर शनिवारी कोथरूड पोलिसांनी आदर्शला चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर रात्री उशिरा त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली. दरम्यान, रविवारी न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली. 

पेपरफुटीप्रकरणी महाविद्यालयावर काय कारवाई करणार, याबाबत विद्यापीठाची भूमिका जाणून घेण्यासाठी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 

Web Title: Student arrested on paperleak case