कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची इमारतीवरून उडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

परीक्षेत गुण कमी मिळाल्याने सहावीतील विद्यार्थिनीने शाळेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. 

पिंपरी चिंचवड : परीक्षेत गुण कमी मिळाल्याने सहावीतील विद्यार्थिनीने शाळेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास निगडीजवळील त्रिवेणीनगर येथील एका शाळेत घडली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जखमी विद्यार्थिनीला मागील परीक्षेत कमी गुण मिळाल्याने ती निराश होती. दरम्यान, सोमवारी शाळेचा 'ओपन डे' असल्याने विद्यार्थ्यांचे पालकही शाळेत आले होते. दुपारी अडीचच्या सुमारास 'ओपन डे'चा कार्यक्रम झाल्यानंतर विद्यार्थिनीची आई शाळेच्या इमारतीच्या खाली थांबली होती.

त्या वेळी तिने शाळेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. यात ती गंभीर जखमी झाल्याने तिला तातडीने निगडीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student attempts to suicide

टॅग्स