विद्यार्थ्यांनी शास्त्रकार बनावे - डॉ. धांडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

पुणे - ‘‘शास्त्रज्ञ संशोधनातून नवनिर्मिती करतो, तर कलाकार साधनेतून कलाकृती साकारतो. शास्त्रज्ञ आणि कलाकार यांचा संगम झाला, तर अनेक नव्या गोष्टी निर्माण होतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शास्त्रज्ञ व कलाकार यांच्यातील गुण आत्मसात करून शास्त्रकार बनावे,’’ असे मत ‘आयआयटी कानपूर’चे माजी संचालक डॉ. संजय धांडे यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त भारतीय विद्याभवन संस्थेच्या मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे आयोजित दोन दिवसीय ‘यंग एक्‍सप्लोरर’ या आंतरशालेय विज्ञान प्रकल्प स्पर्धेचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते झाले.

महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, भारतीय विद्या भवन संस्थेचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे, विज्ञानशोधिकेचे मानद संचालक अनंत भिडे, नेहा निरगुडकर, भारती बक्षी उपस्थित होते.  

डॉ. धांडे म्हणाले, ‘‘विज्ञान ही अनुभवातून शिकण्याची गोष्ट आहे, त्यामुळे वर्गाबाहेर आपण जे शिकतो, ते अधिक महत्त्वाचे असते. भोवतालचे निरीक्षण करून शास्त्रीय ज्ञान आत्मसात केले आणि त्याला आपल्यातील कल्पक शक्तीची जोड दिली, तर नवनिर्मिती करणे शक्‍य होते. उत्सुकता, सर्जनशीलता आणि नवनिर्मिती यातूनच शास्त्रज्ञ आणि कलाकारही घडत असतो, त्यामुळे विद्यार्थ्यांनी या तीन गोष्टी आत्मसात कराव्यात.’’

कुणाल कुमार म्हणाले, ‘‘आज प्रत्येक क्षेत्रात इनोव्हेशनमुळे मोठे बदल घडत आहेत. समाजाचे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी इनोव्हेशन महत्त्वाची भूमिका बजावीत आहे. त्यासाठी शालेय वयातच विद्यार्थ्यांनी चौकटीबाहेरचा विचार करण्याची सवय लावली पाहिजे. भवताल समजून घेऊन त्याचे कृतीत रूपांतर करण्यासाठी प्रयत्न केला, तर देशासाठी अभिमानास्पद अशी कामगिरी आपल्या हातून होईल.’’ 

स्पर्धेसाठी ४५ शाळांतून २५० पेक्षा अधिक प्रकल्प आले होते. रश्‍मी बहुलकर व स्नेहलता शेलार यांनी या प्रकल्पाचे संयोजन केले आहे.

प्रश्‍नमंजूषा स्पर्धेत ‘ब्लू रिज’ शाळेला प्रथम क्रमांक
विज्ञानशोधिकेतर्फे घेतलेल्या प्रश्‍नमंजूषा स्पर्धेत ‘ब्लू रिज शाळे’ने प्रथम क्रमांक मिळवला. हर्ष पाटील, अखिलेश खांबेकर आणि आयुष मंचालवार या विद्यार्थ्यांच्या गटाने बाजी मारली. सिंबायोसिस स्कूलने द्वितीय, तर कल्याणीनगर येथील बिशप स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक मिळवला.

Web Title: student become scientist