विद्यार्थ्यांनी अकरावी पासुनच करीअरच्या दिशेने वाटचाल करावी-विवेक वेलणकर

रमेश मोरे
रविवार, 1 एप्रिल 2018

जुनी सांगवी-  दहावी नंतर काय कुठल्या दिशेने शैक्षणिक प्रवास करावा, आजच्या स्पर्धेच्या युगात दहावी सुटली की करीअरच बारावी नंतर बघु असं म्हणत वेळ वाया जातो आणी दिशा ठरत नाही. म्हणुन अकरावी पासुनच करीअरच्या दिशेने विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी असे नवी सांगवी येथे सकाळ विद्या व युनिक क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहावी नंतरच्या करिअर चर्चासत्र मार्गदर्शन मेळाव्यात बोलताना करिअर तज्ञ  विवेक वेलणकर यांनी व्यक्त केले.

जुनी सांगवी-  दहावी नंतर काय कुठल्या दिशेने शैक्षणिक प्रवास करावा, आजच्या स्पर्धेच्या युगात दहावी सुटली की करीअरच बारावी नंतर बघु असं म्हणत वेळ वाया जातो आणी दिशा ठरत नाही. म्हणुन अकरावी पासुनच करीअरच्या दिशेने विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी असे नवी सांगवी येथे सकाळ विद्या व युनिक क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहावी नंतरच्या करिअर चर्चासत्र मार्गदर्शन मेळाव्यात बोलताना करिअर तज्ञ  विवेक वेलणकर यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले,शाखा कुठलीही असो आजची शिक्षण पद्धती व कालचा शैक्षणिक काळ पाहता आजच्या स्पर्धेच्या युगात  स्पर्धा वाढली असली तरी स्पर्धेबरोबर करीअरच्या संधीही मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. दहावी नंतर अकरावीसाठी करीअरच्या दृष्टीने विषय निवडावे. आज इंडीयन रेल्वेपासुन ते विविध महामंडळांच्या क्षेत्रापर्यंत करीअरच्या संधी उपलब्ध आहेत. यासाठी दहावी नंतर करीअरच्या दिशेने वाटचाल करावी.सध्या शिक्षण क्षेत्रात रोज नवनविन संकल्पना व बदलते स्वरूप स्पर्धेच्या रूपाने समोर येत आहेत. त्यास सामोरे जाण्यासाठी नियोजन बद्ध अभ्यास व करीअर क्षेत्राची निवड करून विद्यार्थ्यांनी अकरावी पासुनच त्यास सामोरे गेले पाहिजे.

दुस-या सत्रात प्रा.संदीप पवार यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले या सुटीच्या काळात विद्यार्थ्यांनी अकरावी विषयांची निवड करून आतापासुनच अभ्यासाला सुरूवात करावी.इंजिनिअरिंगला जायचं की विज्ञान शाखेला ही मनस्थिती बदलुन स्वता:तील सकारात्मकता जागरूक ठेवावी. करीअर निवडताना आपल्या आवडीनुसार त्या क्षेत्रातील विषयांची निवड करावी. आज शिक्षणासाठी सरकारकडुन  शैक्षणिक कर्ज देते. यावर सबसिडीही असते. मात्र अनेक पालकांना याची सखोल माहिती नसल्याने या संधीपासुन ते वंचित राहतात. तर आयआयटीला प्रवेश मिळवण्यासाठी जेईई प्रमुख परिक्षेला कसे सामोरे जावे, जेईई नंतर जेईई अँडव्हान्स परिक्षेस कसे सामोरे जावे विषयांची निवड कशी करावी याबाबत प्रा.पवार यांनी उपस्थित विद्यार्थी पालकांना सखोल मार्गदर्शन केले. अकरावी बारावी स्टेट बोर्ड परिक्षा व सीबीएसई बोर्ड हा अभ्यासक्रम जवळपास एकच असल्याचे यावेळी त्यांनी सांगीतले. तर शाखा कुठलीही असो इंजिनिअरिंग मेडीकल शाखेशिवाय आज आर्टिटेक्चर,अँग्रीकल्चर,फुड टेक्नोलॉजी असे अनेक पर्याय व त्यातील करीअरच्या संधी विद्यार्थ्यांना आज उपलब्ध आहेत.प्रत्येक विषयातील संधी व परिक्षा तयारी बाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

सिझन सोशल वेलफेअर ट्रस्ट व प्रशांत शितोळे मित्र परिवार प्रायोजित संस्कृती लॉन्स नवी सांगवी येथे जुनी सांगवी,नवी सांगवी परिसरातुन पालक व विद्यार्थी  मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत शितोळे यांनी केले.ते म्हणाले सकाळ विद्या विद्यार्थ्यांसाठी राबवत असलेला हा शैक्षणिक उपक्रम स्तुत्य आहे.विद्यार्थी व पालकांनी या संधीचा वेळोवेळी लाभ घेवुन यश संपादन करावे. यावेळी व्यासपिठावर  सकाळचे जाहिरात व्यवस्थापक मिलिंद भुजबळ,प्रशांत शितोळे,विवेक वेलणकर, प्रा.संदीप पवार उपस्थित होते.

Web Title: student carrier guidance at sangvi