गाडीखेलच्या अंगणवाडी, जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांनी काढली दिंडी

संतोष आटोळे 
शनिवार, 21 जुलै 2018

अभंग गायन केले, मुलांनी मुलगी वाचावा, वृक्षतोड थांबवा अशा प्रकारच्या संदेश देणाऱ्या घोषणा दिल्या. यानंतर गावातील मारुती मंदिरामध्ये आरती घेतली आणि त्यानंतर मुलींनी फुगड्या खेळल्या आणि आहार वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.

शिर्सुफळ : गाडीखेल (बारामती) येथील अंगणवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विठ्ठल रुक्मिणीच्या पोशाखाने सर्वांचे लक्ष वेधुन घेतले.

आज शनिवार (ता.21) रोजी सकाळी अंगणवाडी केंद्र व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाडीखेल यांच्या सयुंक्त विद्यमाने बलाचमूंच्या पालखी महोत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये विठ्ठल रुख्मिणी सह विविध रूपे साकारण्यात आली होती. अभंग गायन केले, मुलांनी मुलगी वाचावा, वृक्षतोड थांबवा अशा प्रकारच्या संदेश देणाऱ्या घोषणा दिल्या. यानंतर गावातील मारुती मंदिरामध्ये आरती घेतली आणि त्यानंतर मुलींनी फुगड्या खेळल्या आणि आहार वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.

यावेळी सरपंच बाळासाहेब आटोळे,अंगणवाडी कार्यकर्ती मंगल आवदे, मदतनीस पूनम सुतार, शिक्षिका शुभांगी वाघमारे, बल्लाळ मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वामन आटोळे, शरद शेंडे, डॉ.आबसो आटोळे, विश्वास आवदे, मोहन पोमने, अनिल लोखंडे, अशोक चव्हाण, अजिनाथ आटोळे, सुरेश शेंडे यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: student dindi in Baramati