विद्यार्थ्यांनी साधला डॉ. नारळीकरांशी संवाद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

मुंढवा - तुम्ही कोणता क्‍लास लावला होता? तुम्ही अभ्यास कसा केला? यासह अंतराळात प्रवेश केल्यावर काय होईल? ब्लॅक होलमध्ये प्रवेश केल्याचे काय परिणाम होतील? असे प्रश्न विचारत विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्याशी संवाद साधला. 

मुंढवा - तुम्ही कोणता क्‍लास लावला होता? तुम्ही अभ्यास कसा केला? यासह अंतराळात प्रवेश केल्यावर काय होईल? ब्लॅक होलमध्ये प्रवेश केल्याचे काय परिणाम होतील? असे प्रश्न विचारत विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्याशी संवाद साधला. 

सकाळ प्रकाशन व बनकर क्‍लास, हडपसर यांच्या संयुक्‍त विद्यमाने डॉ. नारळीकर यांची प्रकट मुलाखत व प्रश्‍नोत्तरांचा कार्यक्रम हडपसरमधील साधना विद्यालयाच्या कर्मवीर सभागृहात आयोजित करण्यात आला होता. डॉ. जयंत गाडगीळ यांनी ही मुलाखत घेतली.   मी शास्त्रज्ञ कसा झालो? व नव्या सहस्त्रकाचे नवे विज्ञान या पुस्तकांच्या निमित्ताने  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  

या वेळी मंगला नारळीकर यांचा सकाळ प्रकाशनाचे आशुतोष रामगीर व बनकर क्‍लासचे जितेंद्र बनकर यांनी गौरव केला. या प्रसंगी साधना विद्यालयाचे प्राचार्य अजित अभंग, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. 

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. नारळीकर म्हणाले, आमच्या वेळी क्‍लासेस नव्हते. तसेच इंटरनेटही उपलब्ध नव्हते. त्यामुळे अभ्यास करण्यासाठी माझ्याकडे भरपूर वेळ होता. 

भारतातही अंतराळ संशोधन संस्थेत तुम्हाला अभ्यास करता येईल. त्यासाठी परदेशात जाण्याची आवश्‍यकता नाही, असेही त्यांनी सांगितले.  

अकरावी सायन्सला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना बनकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच  नीट, जेईई, सीईटीची तयारी,  त्यासाठीची उपलब्‍ध असलेली पाठ्यपुस्तके इत्यादी विषयांवरही या वेळी माहिती देण्यात आली.

Web Title: student dr. jayant narlikar discussion