विद्यार्थ्यांनी अनुभवले प्रयोगातून विज्ञान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

पुणे - सकाळ एनआयई, अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशन व आयसरमधील सेंटर ऑफ एक्‍सलन्स इन सायन्स अँड मॅथेमॅटिक्‍स एज्युकेशन यांच्या वतीने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला पुणे शहर व जिल्ह्यातील विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी भेट देऊन विविध प्रयोगांची माहिती घेतली. 

पुणे - सकाळ एनआयई, अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशन व आयसरमधील सेंटर ऑफ एक्‍सलन्स इन सायन्स अँड मॅथेमॅटिक्‍स एज्युकेशन यांच्या वतीने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला पुणे शहर व जिल्ह्यातील विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी भेट देऊन विविध प्रयोगांची माहिती घेतली. 

या प्रदर्शनाचे उद्‌घाटन लीला पूनावाला यांचे हस्ते झाले. या वेळी टाटा मोटर्सचे श्रीपादराज पोंक्षे, अगस्त्य फाउंडेशनचे साई चंद्रशेखर, आयसरचे  डॉ. व्ही. एस. राव, डॉ. अपूर्वा बर्वे, शिवांजली गायकवाड, पुष्कराज कौलगुड, अभिषेक जैन आदी उपस्थित होते. विविध शाळांतील विद्यार्थी व शिक्षकांनी बनवलेले भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित या विषयांच्या मूलभूत संकल्पनांवर आधारित प्रयोग या प्रदर्शनात मांडण्यात आले होते.

कृषी रोबोट, हरबरा तोडणी यंत्र, सौरपपं, सौरऊर्जेवरील गवत कापणी यंत्र, स्वयंचलित रेल्वे, अँटिग्रॅव्हिटी आरसे, मूलद्रव्यांची त्रिमितीय आवर्तसारणी, ग्रहणे, दिवसरात्र, ऋतुचक्र इत्यादीविषयी प्रकल्प या वेळी सादर करण्यात आले. स्वतःची प्रयोगशाळा घराच्या घरी कशी बनवावी, आर्ट आणि इनोव्हेशन कॉर्नर, विज्ञान प्रश्‍नमंजूषा, कौन बनेगा विज्ञानपती, मॅजिक सायन्स व विज्ञान धमाका शो, पॅनेल डिस्कशन व वैज्ञानिक फिल्मचे स्क्रीनिंग आदी उपक्रम या प्रदर्शनात होते.

अहल्यादेवी मुलींची शाळा, मॉडर्न हायस्कूल गणेशखिंड, भारतीय विद्याभवन स्कूल व  एन. सी. एल. स्कूल आदींचा या प्रदर्शनात विशेष सहभाग होता. प्रा. एल. एस. शशिधर, अशोक रुपनेर, चैतन्य मुंगी, शुभांगी वानखेडे, शांती पिसे, डॉ. शिल्पा जैन, अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशनचे श्रीशाल धनकवडे, प्रकाश हांडे, एनआयईचे विशाल सराफ, सुमीत जाधव आदींनी संयोजन केले.

Web Title: Student Experiment Science NIE