दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

चिंचवड
कधी : रविवार (ता. १७) 
कोठे : पिरॅमिड हॉल, राजर्षी शाहू उद्यान, गणपती मंदिराजवळ, शाहूनगर 
केव्हा : सकाळी १०.३० वाजता

पिंपरी 
कधी : रविवार (ता. १७) 
कोठे : नाना आफळे विरंगुळा केंद्र, गुणेश मंदिराजवळ, मासुळकर कॉलनी, अजमेरा, पिंपरी 
केव्हा : सायंकाळी ५ वाजता  
अधिक माहितीसाठी संपर्क - ९५४५९५४७३३

पिंपरी - जीवनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी दहावीची परीक्षा महत्त्वाची असते. त्यासाठी योग्य नियोजन करून अभ्यास करणे गरजेचे असते. अशा वेळी मुले व पालकही संभ्रमात असतात. ही गरज ओळखून ‘सकाळ’ व ‘लर्निंग लेन्स ॲकॅडमी’च्या वतीने पिंपरी-चिंचवड येथे रविवारी (ता. १७) चर्चासत्रांचे आयोजन केले आहे. हे चर्चासत्र शाहूनगर व मासुळकर कॉलनी येथे होणार आहेत. 

या चर्चासत्रांत बदललेल्या अभ्यासक्रमानुसार प्रश्‍नपत्रिकांचे स्वरूप, त्यानुषंगाने परीक्षेचा अभ्यास याविषयीच्या टिप्स दिल्या जातील. शैक्षणिक क्षेत्रातील बदलांविषयी सखोल माहिती पालक व विद्यार्थ्यांना मिळेल. बौद्धिक व मानसिक ताण न घेता अशा परीक्षांसाठी मुलांनी कशा पद्धतीने तयारी करावी तसेच अपुऱ्या माहितीमुळे पालकांना पाल्यासाठी कोणते करिअर योग्य आहे, हे नेमके कळत नाही. अशा प्रश्‍नांचे निरसन चर्चासत्रांतून होणार आहे. दहावीनंतर मेडिकल व इंजिनिअरिंग याव्यतिरिक्त उपलब्ध करिअरचे पर्याय, त्यांच्या प्रवेश परीक्षा, विद्यार्थ्यांचा कल पाहून योग्य पर्यायांची निवड कशी करावी, याविषयी करिअर मार्गदर्शक इम्रान शेख व विनीत सुतार हे सखोल मार्गदर्शन व समुपदेशन करणार आहेत. त्याचबरोबर आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी न्यू एज्युकेशन प्लॅन २०२० विषयक माहिती या चर्चासत्रांतून मिळणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: student guidance for ssc exam