विद्यार्थीनीची तीन वर्षापासून जगण्याची झुंज सुरू...

चंद्रकांत घोडेकर
बुधवार, 23 मे 2018

घोडेगाव (पुणे): चिंचोली (ता. आंबेगाव) येथे वास्तव्यास असणारी किरण शेलफड खंदारे (वय 10 वर्ष, मुळगाव भोकर, ता. चिखली, जि. बुलढाणा) या मुलीच्या घशातून गेली 3 वर्ष अन्नाचा कण व पाणी जात नाही. आई व वडील मजूरी करतात. उपचारासाठी पैसे नसल्यामुळे तिची जगण्याची झुंज सुरू आहे. या मुलीला उपचार करण्यासाठी येथील सहानुभुती सेवा संस्था मदतीसाठी धावून आली असून, त्यांनी लोकांकडून देणग्या गोळा करून उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे.

किरण खंदारे ही आता 3 री इयत्तेत चिंचोली येथील जिल्हा परिषद शाळेत शिकत आहे. तीन वर्षापासून तिच्या घशातून पाणी अथवा अन्न जात नाही. आई-वडील मोल मजुरी करतात. तीन वर्षापूर्वी तिच्या पिण्यात पाण्याऐवजी कॉस्टीक सोडा आला. त्यात तिची अन्न नलिका खराब झाली. मुंबई येथे रूग्णालयात उपचार केल्यानंतर तिला जठरात नळी टाकून पाणी व अन्न देण्याची व्यवस्था केली. उपचारासाठी मोठा खर्च असल्याने सध्या तिला पाणी व अन्न नळीतून देण्यात येते. ती शाळेतही जाते. शिक्षकांनी तिला बसण्यासाठी बेंच दिला आहे. वर्गात ती हुशारही आहे. तिची शिकण्याची जिद्द आहे. हा प्रकार सहानुभुती सेवा संस्थेचे संस्थापक श्रीकांत गाढवे यांनी प्रत्यक्ष पाहिला. त्यांनी तिला मदत करण्याचे आश्वासन दिले. याकामी घोडेगाव ग्रामीण रूग्णालयाच्या अधिक्षिका डॉ. गिता कुलकर्णी, डॉ. अरविंद वेखंडे यांनी तपासणी केली त्यांनी काही तपासण्या करण्याच्या सुचना केल्या. तिचा मशिनवरील तपासणीचा सर्व खर्च नारायणगाव येथील कथे डायग्नोस्टॅीक सेंटरचे संचालक पंजाब कथे करणार आहेत. तपासीअंती तिच्या होणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी मदतीची गरज आहे. संस्थेने यासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे.

मंगळवारी (ता. 22) याला प्रतिसाद म्हणून महात्मा फुले पतसंस्थेतर्फे संस्थेचे चेअरमन सखाराम घोडेकर यांनी 2 हजार रूपये, इन्फोटेक कॉम्प्युटर्शचे संचालक सतीश खिंवसरा यांनी 2 हजार रूपये, महात्मा फुले पतसंस्थेचे व्यवस्थापक सचिन काळे 500 रूपये मदत जमा केली आहे. तिला चांगल्या रूग्णालयात नेवून उपचार केले जाणार आहेत. किरणला पुढील आयुष्यासाठी मदतीची गरज आहे. इच्छुकांनी संस्थेचे संस्थापक श्रीकांत गाढवे (मो. नं. 9403190300) व संचालक सुनिल झोडगे (मो.नं. 9011311311) या नंबरवर संपर्क साधून मदत करावी असे आवाहन केले आहे.

Web Title: student kiran khandare need help for hospital