मेजर शहिद नायर यांच्या घरी विद्यार्थ्यांनी लावला आकाशकंदील 

राजेंद्रकृष्ण कापसे
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

यशवंत विद्यालयाच्या इयत्ता दहावी 1992 च्या बॅचने यंदा प्रथमच सामाजिक बांधिलकी एक जपत आगळी वेगळी दिवाळी साजरी केली.

खडकवासला (पुणे) : येथील यशवंत विद्यालयाच्या इयत्ता दहावी 1992 च्या बॅचने यंदा प्रथमच सामाजिक बांधिलकी एक जपत आगळी वेगळी दिवाळी साजरी केली.

खडकवासला गावाचे सुपुत्र शहीद मेजर शशिधरन विजय नायर यांच्या घरी आकाश कंदिल, दीप लावून, रांगोळी काढून तसेच त्यांना दिवाळीचा फराळ आणि त्यांच्या आईचा उचित सन्मान करून त्यांची दिवाळी गोड केली. त्यांच्या आणि प्रति आपली सद्भावना व कृतज्ञता व्यक्त केली.

याप्रसंगी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये पुण्याचे मंडई मंडळाचे कार्याध्यक्ष भोला वांजळे माजी सरपंच प्रशांत नानगुडे, देवेंद्र मते त्याचबरोबर सुरेखा वाल्हेकर मोडक, लक्ष्मण माताळे, रुपेश केंगले, रमेश करंजावणे, दादा रिंढे, संजय ठोंबरे, राहुल मते, सचिन मते, श्रीनिवास गोगावले, आणि बालमित्र उपस्थित होते. 

मेजर नायर हे जम्मू-काश्मीरमधील राजौरीत झालेल्या आयईडी स्फोटात शहीद झाले नौशेरा सेक्टरमध्ये पेट्रोलिंग करत असलेल्या जवानांना लक्ष्य करण्यासाठी दहशतवाद्यांकडून हा स्फोट घडवून आणला होता. त्यात नायर यांना वीरमरण आलं. त्यांच्या बरोबर आणखी एक जवान शहीद झाला. मेजर नायर हे 2/11 गोरखा रायफलमध्ये कार्यरत होते. शशीधरणचे बलिदान देशासाठी होते. त्याच्या कुटुंबीयाना दिवाळीत त्यांना मुलगा मेजर शशीधरन सोबत नाही. तो आता नाही, पण आम्ही आम्ही सर्वजण त्याच्या वयाचे असून तुमच्या सोबत आहोत. हे शाहिद कुटुंबाला जगण्याचे बळ देण्यासाठी हा उपक्रम राबविला. असे रमेश करंजावणे यांनी सांगितले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: student lights lantern at Martyard Nayar s Home