इंदापुरात विद्यार्थी बनविणार अलिशान मोटार

Modern Car
Modern Car

भवानीनगर - वाहनांच्या क्षेत्रात ‘बीएमडब्ल्यू’ हे नाव कोणाला परिचित नाही? प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या कंपनीच्या चारचाकी गाड्यांचे आकर्षण नेहमीच असते. आता हीच गाडी इंदापूरच्या एस. बी. पाटील तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांना चक्क ‘शिकायला’ मिळणार आहे. तंत्रनिकेतन व बीएमडब्ल्यू ग्रुप इंडिया यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार बीएमडब्ल्यू ग्रुप हा येथे सुसज्ज वर्कशॉप उभारणार असून, अशा प्रकारचा हा पहिलाच करार आहे.

‘कॅम्पस इंटरव्ह्यू’मध्ये प्रतिष्ठित कंपन्या सहभागी होऊन अभियंत्यांना आजवर शोधत होत्या; परंतु इंदापुरात प्रथमच बीएमडब्ल्यू वाहन कसे तयार होते, त्याचे इंजिन तयार होण्याची पद्धत इथपासून ते बीएमडब्ल्यू ग्रुपमधील तंत्रज्ञांकडून थेट प्रशिक्षण मिळण्याची सुविधा एस. बी. पाटील तंत्रनिकेतनमध्ये मिळणार आहे. 

जागतिक दर्जाच्या एखाद्या कंपनीशी अशा पद्धतीचा करार करणारे एस. बी. पाटील तंत्रनिकेतन हे परिसरातील पहिले तंत्रनिकेतन ठरले आहे. शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. हर्षवर्धन पाटील, संस्थेच्या सचिव भाग्यश्री पाटील, विश्वस्त अंकिता पाटील व मार्गदर्शक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हे वर्कशॉप उभारले जाणार असून, हा करार होण्यासाठी तंत्रनिकेतनचे प्राचार्य उमेश बोधले यांनी वेळोवेळी याचा पाठपुरावा केला.

चेन्नईतील तंत्रज्ञ करणार मार्गदर्शन
तंत्रनिकेतन व बीएमडब्ल्यू ग्रुपमध्ये ५ जुलै रोजी सामंजस्य करार झाला. या करारानुसार बीएमडब्ल्यू ग्रुप येथे सुसज्ज वर्कशॉप उभारेल व कंपनीच्या चेन्नई येथील प्रकल्पातील तंत्रज्ञ व कुशल मार्गदर्शक हे एस. बी. पाटील तंत्रनिकेतनमध्ये थांबून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करतील. कंपनीमध्ये प्रत्यक्ष कशा पद्धतीने काम केले जाते, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय निकष कसे असतात, याविषयी सखोल व उच्च दर्जाचे प्रशिक्षण अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना यातून मिळेल. याखेरीज बीएमडब्ल्यू वाहने व त्यामधील असणारे इंजिनांचे प्रकार याविषयीसुद्धा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com