संतापजनक! आधी नस कापली नंतर पंख्याला लटकवलं; अभ्यासावरून १२वीच्या विद्यार्थ्याकडून आईची हत्या | Pune Crime News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

student of class 12 has killed a mother who was angry over using a mobile phone in loni kalbhor pune

Pune Crime News: संतापजनक! आधी नस कापली नंतर पंख्याला लटकवलं…; अभ्यासावरून १२वीच्या विद्यार्थ्याकडून आईची हत्या

Pune Crime News : शुल्लक कारणामुळे चिडलेल्या १२ वीच्या मुलाने स्वतःच्या जन्मदात्या आईचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकेच नाही तर स्वतःला वाचवण्यासाठी त्याने आईने आत्महत्या केल्याचा बनव रचला.

अभ्यास करताना सारखा मोबाईल पाहतो म्हणून आई रागवली. या गोष्टीचा राग आल्याने १८ वर्षीय तरुणाने स्वतःच्याच आईची हत्या केलीय. पुण्यातील लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पुण्यातील उरळी कांचन भागात ही घटना बुधवारी दुपारी घडली. तस्लिम शेख (३७) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा मुलगा जिशन शेख (१८) यानेच हत्या केली असल्याचे समोर आले .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तस्लिम शेख या त्यांच्या पती आणि मुलासह उरळी कांचन भागात राहायला होत्या. सुरवातीला तस्लिम यांनी आत्महत्या केली अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र शवविच्छेदन झाल्यानंतर ही आत्महत्या नसून खून आहे निष्पन्न झाले. पोलिसांनी घरातील व्यक्तींची चौकशी केली असता जिशन ने सगळा प्रकार सांगितला.

काही दिवसांपूर्वी जिशन जो बारावीला आहे. तो अभ्यास करत असताना मोबाईल पाहतो म्हणून आईने रागवून मारलं होतं. याचा राग अनावर झाल्याने जिशनने त्याच्या आईला भिंतीवर ढकललं आणि तिचा गळा दाबून खून केला.

नंतर घाबरलेल्या जिशानने त्याच्यावर संशय येऊ नये म्हणून आईच्या हाताची नस कापली, मात्र रक्त न आल्याने त्याने मृतदेहाला पंख्याला लटकवले आणि आईने आत्महत्या केली असा बनाव केला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Pune NewsPune Crime News