महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे स्नेहमेळाव्याचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

पुणे : पुण्यातील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (एमईएस) ही नामांकित संस्था 19 नोव्हेंबरला 159व्या वर्षात पदार्पण करीत आहे. याचनिमित्ताने 24 नोव्हेंबर (शनिवार) या दिवशी माजी विद्यार्थ्यांसाठी स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. एमईएसच्या गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर हा स्नेहमेळा आयोजित केला आहे.

एमईएसतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. माजी विद्यार्थ्यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांमधील 71 शाखांतील माजी विद्यार्थ्यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

स्नेहमेळाव्याच्या वाहनतळाची व्यवस्था सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत करण्यात आली आहे. 

वेळ : दि. 24 नोव्हेंबर, शनिवार, सायं. 5 ते 9
स्थळ : आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे पटांगण, कर्वे रस्ता, पुणे

Web Title: Student Reunion of Maharashtra Education Society