वाघळवाडी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीची आंतरराष्ट्रीय रेसलिंगसाठी निवड 

pd29.j
pd29.j

सोमेश्वरनगर (पुणे) : वाघळवाडी (ता. बारामती) येथील उत्कर्ष आश्रमशाळेच्या निकिता शिवाजी लेंबे हिने राष्ट्रीय पातळीवरील बेल्ट रेसलिंग व मास रेसलिंग या दोन्ही स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. यामुळे आता ती आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणार आहे. 

हैदराबाद येथे 21 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत ऑल इंडिया ट्रॅडिशनल रेसलिंग अँड पॅनक्रेशन फेडरेशन व तेलंगणा कुस्ती फेडरेशन यांच्यातर्फे "नॅशनल ट्रॅडिशनल रेसलिंग अँड पॅनक्रेशन चॅंपियनशिप - 2019' या आठव्या कुस्ती स्पर्धा झाल्या. 29 राज्यातील 600 खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. महाराष्ट्राच्या चमूचे नेतृत्व निकिता लेंबे हिने केले. तिने सतरा वर्ष वयोगटाखालील 38 किलो वजनगटात बेल्ट रेसलिंग व मास रेसलिंग या दोन्ही प्रकारात तिने प्रत्येकी पाच कुस्त्या करत सुवर्णपदक पटकावले. नागालॅंड, मणिपूर, पश्‍चिम बंगाल, तेलंगणा राज्यातील मल्लांना तिने पराभूत केले. तेलंगणाचे क्रीडामंत्री श्रीनिवास गौड, गृहमंत्री महेमूद अली यांच्या उपस्थितीत तिचा गौरव झाला. 

आश्रमशाळेत ती बारावी विज्ञान शाखेत शिकत आहे. यांत्रामध्ये कुस्ती स्पर्धा करणाऱ्या निकिताला मार्गील वर्षभरापासून पैलवान अवधूत कोरडे यांचे मार्गदर्शन मिळाले आणि ती जिल्हा, राज्य पातळीवर चमकली होती. याशिवाय प्रल्हाद जाधव, अमोल साठे, युवराज पवार, तुषार मोहिते आदींनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका रोहिणी सावंत, अजिंक्‍य सावंत, आंतरराष्ट्रीय धावपटू जगन्नाथ लकडे यांनी तिचे अभिनंदन केले. 
  
अक्षय शिंदे फाउंडेशनकडून मदत 
आंतरराष्ट्रीय स्पर्धा तुर्कमेनिस्तान किंवा रशियामध्ये होणार आहेत. सामान्य कुटुंबातील निकिताला तिथे पोचण्यासाठी अक्षय शिंदे फाउंडेशनतर्फे पंचवीस हजार रुपयांची मदत करण्यात आली. तिरुपती बालाजी ऍग्रो उद्योगाचे अध्यक्ष आर. एन. शिंदे व व्यवस्थापक संजय शिंदे यांच्या हस्ते तिला या रकमेचा धनादेश देण्यात आला. ऍड. नवनाथ भोसले यांनीही तिला वस्तुरूपी मदत केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com