प्रेमभंग झाल्याने विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

आत्महत्येपुर्वी लिहिलेल्या पंधरा पानांच्या पत्रामध्ये त्याने आत्महत्या करीत असल्याबद्दल आपल्या आई, वडील व भावाला उद्देशून वारंवार माफी मागितलेली आहे.

मांजरी - व्यवस्थापन शास्त्र अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्याने प्रेमभंग झाल्यामुळे मानसिक तणावाखाली येवून आपल्या राहत्या घरी फॅनला नायलॉनची दोरी लावून गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने पंधरा पानांचे पत्र लिहिले आहे. ही घटना काल दुपारी ५ वाजण्याच्या सुमारास हडपसर येथील अमनोरा पार्क येथे घडली.

अक्षय अखिलेशवर कुमार (वय २२, रा. टॉवर न. २५, अमनोरा पार्क) मूळ राहणार विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. आयबिएस कॉलेज, मगरपट्टा येथील व्यवस्थापन शास्त्र विषयाचा विद्यार्थी होता. त्याने आपल्या राहत्या घरी नायलॉन दोरीच्या सहाय्याने फॅनला लटकून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने तब्बल पंधरा पानांचे पत्र लिहून त्यांच्या खोलीमधील फ्रिजवर ठेवले होते. त्याचे एका मुलीवर गेले आठ महिन्यांपासून प्रेम होते. ते एकमेकांना भेटत असे. मात्र गेले तीन महिन्यांपासून ती मुलगी भेटण्यास नकार देत होती. त्या दोघांच्या प्रेमसंबंधांमध्ये वितुष्ट निर्माण झाले. प्रेमभंग झाल्यामुळे तो मानसिक तणावाखाली वावरत होता. गेली महिनाभर तो कॉलेजलाही जाण्याचे टाळत होता. रूमच्या बाहेर जास्त जात नव्हता. काल दिवसभर त्याच्या काही मित्रांनी फोन केले. त्याने फोन न घेतल्यामुळे त्याचे मित्र त्याच्या रूममध्ये त्याला पाहण्यासाठी गेलेल्या असताना त्याने दरवाजा उघडला नाही. खिडकीतून डोकाऊन पाहिले असता त्याने आत्महत्या केल्याचे दिसून आले.

आत्महत्येपुर्वी लिहिलेल्या पंधरा पानांच्या पत्रामध्ये त्याने आत्महत्या करीत असल्याबद्दल आपल्या आई, वडील व भावाला उद्देशून वारंवार माफी मागितलेली आहे. तसेच मित्रांना उद्देशूनही माफी मागितलेली आहे. पत्रामध्ये त्याने प्रेमाची सुरवात ते शेवट इथपर्यंत सर्व नमूद केलेले आहे.

हडपसर पोलिस ठाण्यात आकस्मात मयत दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास उपनिरीक्षक माणिक डोके करीत आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: A student suicide by hanging at manjari pune