आत्मदहन करण्यापलीकडे आम्हाला पर्याय नाही; या संघटनेनं दिला इशारा

सिंहगड रस्ता - विद्यार्थी वाहतूक चालक-मालक संघटनेतर्फे क्षेत्रीय कार्यालयासमोर आंदोलन करताना सभासद.
सिंहगड रस्ता - विद्यार्थी वाहतूक चालक-मालक संघटनेतर्फे क्षेत्रीय कार्यालयासमोर आंदोलन करताना सभासद.

सिंहगड रस्ता - ‘आमची वाहने चार-पाच महिन्यांपासून जागेवर थांबली आहेत, हाताला दुसरे काम नाही, उत्पन्नाचे साधन नाही, चरितार्थ चालवणे आता शक्‍य होत नाही, अशा स्थितीत आत्मदहन करण्यापलीकडे आम्हाला पर्याय नाही. आता तरी आमच्या मागण्यांकडे लक्ष द्या’, असे आवाहन विद्यार्थी वाहतूक चालक- मालक संघटनेने प्रशासनाला केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाच्या समोरील जागेत शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. संघटनेच्या वतीने आतापर्यंत राज्याचे मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, स्थानिक खासदार, पोलिस प्रशासनासह विविध ठिकाणी निवेदनांसह मागण्या मांडण्यात आल्या आहेत.

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या चालक - मालकांनी सांगितल्यानुसार १३ मार्चपासून विद्यार्थी वाहतूक बंद आहे. त्यामुळे सर्वांचे उत्पन्न बंद आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हाताला काम नसल्याने, तसेच उदरनिर्वाहाचे कोणतेच साधन उपलब्ध नसल्याने कुटुंबाचे पालनपोषण करणे अवघड झाले आहे. शाळा केव्हा सुरू होणार, याचे ठोस उत्तरही कोणाकडे नाही. त्यामुळे आता सहनशीलतेचा अंत होत आहे. नैराश्‍यामुळे आत्महत्या करावीशी वाटत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन योग्य त्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

भगवे वादळ, महाराष्ट्र राज्य चालक-मालक विद्यार्थी वाहतूक संघटना, पुणे शहर आणि पुणे जिल्हा यांच्या वतीने माणिकबाग डीपी रस्त्यावर आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख योगेश बुराडे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विशाल गोरड, यांनी केले. पुणे शहर अध्यक्ष सुरेंद्र दसवडकर, उपाध्यक्ष सचिन मोरे, कार्याध्यक्ष रवी गुंजाळ, पुणे जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय चव्हाण, प्रवीण जागडे, गणेश उत्तेकर, तेलंग, गणेश देशमुख, महिला अध्यक्षा आशा बोत्रे, सविता कुंभार आदी उपस्थित होते. 

संघटनेच्या या आहेत मागण्या...

  • सदस्यांना दरमहा दहा हजार रुपये अनुदान मिळावे.
  • वाहतूक कर, विमा संरक्षण, व्यावसायिक कर, सुदृढता यांसह इतर कर एक वर्षासाठी माफ करावेत.
  • शाळा सुट्टीच्या दिवशी राज्यात प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी मिळावी.
  • सर्व बॅंका, फायनान्स कंपन्यांचे कर्जहप्ते फेडण्यासाठी एक वर्ष मुदतवाढ मिळावी.
  • कर्जावरील व्याज माफ करावे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com