जय हरी विठ्ठलच्या घोषात सांगवीत विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा

रमेश मोरे
सोमवार, 23 जुलै 2018

विठ्ठल म्हणजे भक्तीचा अथांग सागर, टाळ मृदंग वीणा गंध बुक्का म्हणजे विठ्ठल, वारीतील वारकऱ्यांची भक्ती व नामसंकीर्तनाचा उत्सव म्हणजे विठ्ठल, सर्व बाळगोपाळ म्हणजे विठ्ठल, पूर्ण विश्व व्यापून टाकणाऱ्या या बाळगोपाळांच्या लाडक्या विठ्ठलाची भक्ती करण्यासाठी आषाढी एकादशी निमित्त छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सांगवीच्या कै. शकुंतलाबाई आनंदराव शितोळे प्राथमिक शाळा, शिशु विहार, नूतन माध्यमिक विद्यालय, मॉडर्न नर्सरी, श्रीमती सुंदराबाई भानसिंग हुजा गुरू गोविंद इंग्लिश मिडीयम स्कूल, आयडियल सेकंडरी इंग्लिश मिडीयम स्कूल सांगवीच्या वतीने प्रबोधन पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता.
 

जुनी सांगवी- विठ्ठल म्हणजे भक्तीचा अथांग सागर, टाळ मृदंग वीणा गंध बुक्का म्हणजे विठ्ठल, वारीतील वारकऱ्यांची भक्ती व नामसंकीर्तनाचा उत्सव म्हणजे विठ्ठल, सर्व बाळगोपाळ म्हणजे विठ्ठल, पूर्ण विश्व व्यापून टाकणाऱ्या या बाळगोपाळांच्या लाडक्या विठ्ठलाची भक्ती करण्यासाठी आषाढी एकादशी निमित्त छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सांगवीच्या कै. शकुंतलाबाई आनंदराव शितोळे प्राथमिक शाळा, शिशु विहार, नूतन माध्यमिक विद्यालय, मॉडर्न नर्सरी, श्रीमती सुंदराबाई भानसिंग हुजा गुरू गोविंद इंग्लिश मिडीयम स्कूल, आयडियल सेकंडरी इंग्लिश मिडीयम स्कूल सांगवीच्या वतीने प्रबोधन पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता.

संस्थेचे श्री. रामभाऊ खोडदे यांच्या हस्ते पालखी पुजनाने सोहळ्याची सुरूवात करण्यात आली. यावेळी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत चोखा मेळा, संत जनाई, संत मिराबाई, विठ्ठल रखुमाई, संत रामदास, संत गोरा कुंभार, संत मुक्ताबाई, संत सोपान, वासुदेव इत्यादींच्या वेशभूषा विद्यार्थ्यांनी करून ते प्रत्यक्ष लोकांपर्यंत जाऊन प्लास्टिक बंदी, साक्षरता, पर्यावरण, स्वच्छता, वृक्ष संवर्धन, प्रदूषण, या विषयी महिती देत होते.

आपल्या देशाचे व आरोग्याचे रक्षण कसे करावयाचे, समाजाने सार्वजनिक स्वच्छता कशी ठेवावी लोकांची आपल्या प्रति काय जबाबदारी आहे हे पथनाट्याद्वारे विद्यार्थींनी सांगतले. सांगवीकर नागरीकांनी या भक्तीमय पालखी सोहळ्यात सहभागी होवुन दाद दिली. ह .भ .प .मनोहर पवार व अखिल सांगवी भजनी मंडळाचे सर्व सदस्य या वारीमध्ये सहभागी झाले होते. गजानन महराज मंदिर मैदानावर गोल रिंगण करण्यात आले. चौघडा  वादक गणेश पाचंगे यानी पालखी सोहळ्यात चौघडा वादन केले.

पालखीची सांगता आरती व  विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करून करण्यात आली. पालखी सोहळ्यात संस्थेचे सचिव परशुराम मालुसरे, शाळेच्या निवृत शिक्षिका राजश्री जाधव, हनुमंत जाधव, चंद्रकांत माने, विलास थोरवत, सुमन कारखानीस, विजय शिंदे शाळेच्या शिक्षक पालक संघ व व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, पालक उपस्थित होते. पालखीचे संयोजन शिवाजीराव माने व शोभा वरठी यांच्या मार्गदर्शनाखाली केले.

Web Title: student vitthal dindi in sangavi