चक्क झेडपी शाळेसाठी विद्यार्थ्यांचे वेटिंग, कुठे आहे ही शाळा?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

सध्या जिल्हा परिषद शाळेत किमान पटसंख्येसाठी शिक्षकांना दारोदार जावे लागत असताना वाबळेवाडी शाळेच्या यशाची ही किमया साधणारे राष्ट्रपती पारितोषिक विजेते शिक्षक दत्तात्रय वारे व एकनाथ खैरे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचे कार्य रोल मॉडेल ठरले आहे.

कोरेगाव भीमा - भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा, वाबळेवाडी (ता. शिरूर) या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी प्रवेश प्रतीक्षा यादीचाही उच्चांक झाला आहे. केवळ ३२ पटसंख्येवरून सहाशे विद्यार्थ्यांना मराठीतून दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शाळेत प्रवेशाची प्रतीक्षा यादी पाच हजारांवर गेल्याने आता नवी नोंद घेणेही थांबवावे लागले आहे, असे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या जिल्हा परिषद शाळेत किमान पटसंख्येसाठी शिक्षकांना दारोदार जावे लागत असताना वाबळेवाडी शाळेच्या यशाची ही किमया साधणारे राष्ट्रपती पारितोषिक विजेते शिक्षक दत्तात्रय वारे व एकनाथ खैरे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचे कार्य रोल मॉडेल ठरले आहे. दोन गळक्‍या खोल्या व पडक्‍या भिंतींच्या या दोन शिक्षकी शाळेत २०१२ मध्ये बदली होऊन आलेल्या दत्तात्रय वारे यांनी खैरे गुरुजी व ग्रामस्थांच्या सहभागातून प्रयत्न करीत शाळेचे चित्रच बदलले.

Image may contain: 3 people

गावातील १९ महिला बचत गटांनी नफा शाळेला दिला. तरुणांनीही यात्रा, नवरात्र व गणेशोत्सवाचा खर्च टाळून निधी दिला. यात्रेच्या तमाशासाठी जमलेले सव्वा लाख रुपयेही ग्रामस्थांनी शाळेला दिले. त्या रकमेतून वारे गुरुजींनी विद्यार्थ्यांसाठी टॅब घेतले. अन्‌ वाबळेवाडी हे महाराष्ट्रातील पहिले टॅब स्कूल ठरले. वाढत्या विद्यार्थी संख्येसाठी ग्रामस्थांनी दीड एकर जमीन बक्षीसपत्र करून शाळेला दिली. अन शाळेत सर्वांगीण परिवर्तन घडले. वारे गुरुजी व खैरे गुरुजी या दोन्ही शिक्षकांनी अभिनव संकल्पना व नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत शाळेची पटसंख्याही दोनशेवर नेली.

#ThursdayMotivation : निराधार कुटुंबासाठी गाव झाले एकत्र

राज्य सरकारने शाळेत १० शिक्षकांची नियुक्ती केली असून, सध्या शाळेत १२ शिक्षक कार्यरत आहेत. 

‘झिरो एनर्जी स्कूल’
शाळेच्या या नावलौकिकामुळे बॅंक ऑफ न्यूयॉर्क तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मदतीने आंतरराष्ट्रीय दर्जाला जुळणाऱ्या आठ वर्गखोल्यांसह वाबळेवाडीत ‘झिरो एनर्जी स्कूल’ची निर्मिती करण्यात आली. जगभरात जपान आणि आयर्लंडनंतर वाबळेवाडी ही जगातली ही तिसरी ‘झिरो एनर्जी स्कूल’ शाळा ठरली. येथे मुलांना पोहणे, संगीत, नाटक यासह श्रमसंस्कारांचे महत्त्व पटवले जाते. त्यासाठी पंचक्रोशीत एक लाख वृक्षांची लागवड करण्यात आली.

Image may contain: one or more people and outdoor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student waiting for ZP school wablewadi taluka shirur