पुणे विद्यापीठातील हॉस्टेलमध्ये दारू पिऊन धिंगाणा; अवैधरित्या राहणाऱ्यांचे कृत्य

student who illegally living in hostel created razzle after drinking alcohol in Pune University
student who illegally living in hostel created razzle after drinking alcohol in Pune University

पुणे : विद्यापीठातील पाच नंबर होस्टेलमध्ये अवैधरित्या राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी काल रात्री अकराच्या सुमारास दारू पिऊन धिंगाणा घातला. तसेच होस्टेलमधील प्रथम वर्षाच्या मुलांना धमकावून त्रास देण्याचा प्रकार समोर आला आहे.

अवैधरित्या राहणाऱ्या विद्यार्थ्यांना होस्टेलमधून बाहेर काढण्याची मोहीम विद्यापीठाने सुरू केली आहे. त्यामुळे काही रूम या मोकळ्या केल्या आहेत. त्या कुलूपबंद असूनही कुलूप तोडून काही विद्यार्थ्यांनी पाच नंबरमधील होस्टेलमध्ये कालरात्री 'ओली पार्टी' केली. त्यांच्या धिंगाण्यामुळे त्रस्त झालेल्या इतर विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर प्रशासनाने पोलिसांना वर्दी दिली. पोलिसांनी दोन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. मात्र त्यांना कोणत्याही कारवाई विना सोडून देत असल्याचे समजल्यानंतर विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाने फिर्याद दाखल केली.

विद्यापीठाचे कुलसचिव प्रफुल्ल पवार यांनी सांगितले की, '' रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. मद्यपान करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना पोलिसांच्या हवाली केले होते. पण त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली नाही. हे विद्यार्थी अवैधरित्या होस्टेलमध्ये राहात होते. त्यांनी काल रात्री एक विद्यार्थ्याला त्रास दिल्याने त्याची प्रकृती खालावली. त्याला रात्रीच आरोग्य केंद्रात दाखल करावे लागले. या प्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांनी कारवाई केली पाहिजे. 

होस्टेलमध्ये अवैधरित्या राहणाऱ्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याची मोहीम सुरू आहे. त्यामुळे चिडलेल्या मुलांकडून असे प्रकार सुरू आहेत. मात्र शिक्षणासाठी विद्यापीठात आलेल्या विद्यार्थ्यांसाठी या विद्यार्थ्यांवर कारवाई सुरूच राहील." 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com