'अभियांत्रिकी'चा सर्व्हर डाऊन ; विद्यार्थ्यांना मनस्ताप

pune.jpg
pune.jpg

पुणे : अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी अचानक गर्दी वाढली आहे. त्यामुळे 'सर्व्हर डाऊन' झाल्याने अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या. परिणामी, अनेक विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या प्रतिसादामुळे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात येणार आहे. 

पदविका अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. अर्ज भरण्याची मुदत उद्या (ता. 18) संपत आहे. त्यामुळे अर्ज भरण्यास विद्यार्थ्यांची गर्दी वाढली आहे. पुणे विद्यापीठ रस्त्यावर असलेल्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये ही प्रक्रिया सुरू आहे. गेले काही दिवस संथपणे सुरू असलेले हे काम गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये वेगाने सुरू झाले आहे. 

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूळ गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचे दाखले मिळू लागल्याने अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी वाढली आहे. राज्याच्या विविध भागांत अर्ज भरण्यास अचानक गर्दी वाढल्याने सर्व्हर डाऊन होऊ लागल्याने या प्रक्रियेत व्यत्यय येत होता. अर्ज भरण्याची उद्या (ता. 18) शेवटची मुदत असल्याने विद्यार्थ्यांनी अचानक गर्दी केली. यामुळे सर्व्हर डाऊन झाल्याने एक तास ही प्रक्रिया थांबविण्यात आली होती. दुपारनंतर ती पूर्ववत झाली. 

अभियांत्रिकी प्रवेशासाठी मुदतवाढ मिळणार 
तंत्र शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक डॉ. दिलीप नंदनवार म्हणाले, गेले काही दिवस विद्यार्थ्यांची रांग दिसत नव्हती. परंतु, शाळा सोडल्याचा दाखला आणि मूळ गुणपत्रिका मिळू लागल्याने अर्ज निश्‍चित करण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे. काही काळ सर्व्हर डाऊन होता. परंतु, आता पूर्ववत झाला आहे. अर्ज भरण्यास मुदतवाढ मिळणार आहे.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com