esakal | बारामतीतील विद्यार्थी घरबसल्या शिकणार जागतिक अभ्यासक्रम  
sakal

बोलून बातमी शोधा

online

माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन त्यांच्या अंतर्भूत कौशल्याचा उपयोग करिअरसाठी व्हावा व विद्यार्थ्यांना स्वतःचे व्यक्तिमत्त्व विकास उत्तम प्रकारे घडवायचे असेल, तर

बारामतीतील विद्यार्थी घरबसल्या शिकणार जागतिक अभ्यासक्रम  

sakal_logo
By
कल्याण पाचांगणे

माळेगाव (पुणे) : बारामती तालुक्यातील माळेगाव येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांसाठी महाविद्यालयाच्या वतीने तांत्रिक क्षमता व कौशल्य विकासासाठी जागतिक दर्जाचे ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यात चार हजारहून अधिक विविध विषयांवर अभ्यासक्रम असून, चारशेहून अधिक स्पेशलायझेशन सहित उपलब्ध आहेत. 

वाहनचालकांनो, तुमच्यासाठी आहे ही महत्त्वाची बातमी

याबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. मुकणे यांनी माहिती दिली की, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांतून तसेच गुगल, आयबीएम, इंटेल, मायक्रोसॉफ्ट आदी जागतिक दर्जाच्या संस्थांमधील तज्ज्ञांनी तयार केलेले अभ्यासक्रम शिकण्याची संधी उपलब्ध केली आहे. हे ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयातील प्रा. माधव राऊळ व प्रा. हेमंत कुंभार यांनी विशेष परिश्रम घेतले. 

पुरंदरमध्ये एकाच दिवसात सापडले तीन कोरोनाबाधित

माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन त्यांच्या अंतर्भूत कौशल्याचा उपयोग करिअरसाठी व्हावा व विद्यार्थ्यांना स्वतःचे व्यक्तिमत्त्व विकास उत्तम प्रकारे घडवायचे असेल, तर त्यांना कोरसेरासारखे कोर्सेस करणे खूप महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना संचारबंदीच्या कालावधीत घरी बसून विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून दिल्याने महाविद्यालयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

योजनेविषयी थोडक्‍यात 
 - संस्थेच्या वतीने महाविद्यालयाला पाच हजार लायसन कॉपी उपलब्ध 
 - यशस्वीरित्या कोर्स पूर्ण करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ई- सर्टिफिकेट 
 - आतापर्यंत जवळपास तीन हजारहून अधिक विद्यार्थी व शिक्षकांनी घेतला लाभ 
 - जवळपास 700 अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण