विद्यार्थ्यांची पायपीट दूर करणारी "सायकल बॅंक' 

विद्यार्थ्यांची पायपीट दूर करणारी "सायकल बॅंक' 

पुणे - घरापासून शाळा चार-पाच किलोमीटर अंतरावर...घरची आर्थिक स्थिती जेमतेम...मग सकाळी पायपीट करीत शाळेत वेळेवर जायचे कसे? या प्रश्‍नावर पुण्याचे धर्मादाय सहआयुक्‍त दिलीप देशमुख यांनी उत्तर शोधले आहे. मुलामुलींची शाळेतील हजेरी वाढावी, हा उद्देश समोर ठेवून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी "सायकल बॅंक' सुरू केली आहे. याचा शहरी- ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना लाभ होत आहे. 

शहरी भागातील शाळांमध्ये बहुतांश विद्यार्थ्यांना स्कूल बस, मोटारीतून आणि दुचाकीची सुविधा असते; परंतु संसाराचा रहाटगाडा हाकताना आजही अनेकांना मुलामुलींना साधी सायकल घेऊन देणे शक्‍य होत नाही. सहआयुक्‍त देशमुख यांनी सामाजिक संस्थांच्या मदतीने गरीब विद्यार्थ्यांना सायकली मोफत देण्याची संकल्पना मांडली. याची सुरवात रास्ता पेठेतील आबासाहेब अत्रे प्रशालेपासून करण्यात आली. पहिल्यांदा या शाळेतील पाच विद्यार्थ्यांना सायकली देण्यात आल्या. त्यानंतर भोर तालुक्‍यातील आपटी गावातील माध्यमिक विद्यालयातील 29 विद्यार्थ्यांना सायकली वितरित करण्यात आल्या. येत्या काही दिवसांत किमान एक हजार सायकली विद्यार्थ्यांना दिल्या जाणार आहेत. 

"सायकल बॅंके'तून गरजू विद्यार्थ्यांना सायकल मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. परिणामी, विद्यार्थ्यांचा वेळ आणि श्रम वाचतील. यासाठी काही धर्मादाय संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. संस्थेकडून थेट शाळेला धनादेश किंवा सायकली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्व व्यवहार पारदर्शक राहणार आहे. 
- दिलीप देशमुख, धर्मादाय सह आयुक्‍त 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com