विदयार्थ्यांनी वृध्दांसह साजरी केली दिवाळी

संदीप जगदाळे
रविवार, 4 नोव्हेंबर 2018

हडपसर : दिवाळी सर्वत्र उत्साहात साजरी होत असतांनाच सिध्दी वृध्दाश्रमात वर्धमान इंग्लिश मिडियम स्कूल व ज्यूनिअर कॅालेजच्या विदयार्थ्यांनी वृध्दांसोबत दिवाळी साजरी केली.वृध्दाश्रमात कपडे, फराळ, मिठाई कपडे वाटप करण्यात आले. तसेच विदयार्थ्यांनी वृध्दांशी संवाद साधून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले.

वृध्दाश्रमाच्या संचालिका छाया माने म्हणाल्या, ''वृध्दाश्रम हा केवळ अद्ययावत सोयी-सुविधा किंवा आधुनिक वैद्यकिय सोयी आणि यंत्रणा यांनी परिपुर्ण असून चालत नाही, तर शेवटच्या काळात या वृध्दना हव असतं ते प्रेम, आपुलकी माया व पुरेसा आदर. त्यामुळे वर्धमान स्कूलच्या माध्यमातून आमच्या वृध्दाश्रमात दिवाळी साजरी केल्याने वृध्दाश्रमातील वृध्द खूप खूष झाले आहेत. 

वर्धमान स्कूलचे संचालक बी. एस. जाधव म्हणाले, शालेय जीवनातच विदयार्थ्यांना समाजाचे आपण देणे लागतो हि भावना रूजवली पाहिजे, या हेतूनेच वृध्दाश्रमात आमच्या विदयार्थ्यांना दिवाळी साजरी करण्यास प्रोत्साहन दिले. शाळेतील विदयार्थ्यांनी व कर्मचा-यांनी एकत्र येवून वृध्दाश्रमाला मदत केली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students celebrate Diwali with old age people