अकरावी प्रवेशप्रक्रिया- दुसऱ्या फेरीतही वाणिज्यला पसंती 

Commerce
Commerce

पुणे : अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या नियमित फेरीची गुणवत्ता यादी आज प्रसिद्ध झाली. या फेरीतही विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेला पसंती दिली आहे. या फेरीत 20 हजार 601 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. यादीनुसार विद्यार्थ्यांना उद्यापासून 25 जुलैपर्यंत प्रवेश घेता येतील. 

दुसऱ्या फेरीत पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेले विद्यार्थी सहा हजार 738 आहेत, त्यांना मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक आहे. या विद्यार्थ्यांनी "स्टुडेंट लॉगिन'मध्ये जाऊन "प्रोसिड' या बटणावर क्‍लिक करायचे आहे, तरच त्यांचे नाव महाविद्यालयाच्या यादीत समाविष्ट होईल. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळूनही जे विद्यार्थी प्रवेश घेणार नाहीत, त्या विद्यार्थ्याचे नाव पुढील तिसऱ्या नियमित फेरीपर्यंत प्रवेशप्रक्रियेतून प्रतिबंधित करण्यात येईल. 
ज्या विद्यार्थ्यांना दोन ते दहा या पसंतीक्रमातील महाविद्यालय मिळाले आहे आणि त्यांना तेथे प्रवेश घ्यायचा आहे, त्यांनीही लॉगिन करून "प्रोसिड' बटणावर क्‍लिक करायचे आहे. या विद्यार्थ्यांना मिळालेला प्रवेश मान्य नसेल, तर त्यांनी दुसऱ्या फेरीची वाट पाहावी. कोणत्याही महाविद्यालयात तात्पुरता प्रवेश घेऊ नये. जर प्रवेश घेतला आणि काही कारणांनी तो रद्द केला, तर त्या विद्यार्थ्याचे नाव पुढील फेऱ्यांसाठी प्रतिबंधित करण्यात येणार आहे. 

दुसऱ्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश घेण्याची अंतिम मुदत 25 जुलै रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत आहे. याच दिवशी दुसऱ्या फेरीचे कटऑफ आणि तिसऱ्या फेरीसाठी उपलब्ध जागांची माहिती प्रवेशाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. 

दुसऱ्या फेरीसाठी प्राप्त अर्ज ः 32,097 
प्रवेश मिळालेले विद्यार्थी ः 20,601 
पहिला पसंतीक्रम मिळालेले ः 6,738 
प्रवेश न मिळालेले ः 11.496 

दुसऱ्या फेरीतील शाखानिहाय प्रवेश 
विज्ञान : 8452 
वाणिज्य : 9874 
कला : 1908 
व्यावसायिक : 367 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com