विद्यार्थ्यांना मिळेना सरकारी ‘आधार’

विद्यार्थ्यांना मिळेना सरकारी ‘आधार’

पिंपरी - आधारकार्ड काढण्यासाठी मोजकीच केंद्र उपलब्ध असल्याने महापालिका शाळांतील सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नाही. शाळांसाठी विशेष केंद्र सुरू करून त्यांना आधारकार्ड द्यावेत,  अशी मागणी पालकांनी केली आहे. 

शाळेतील नर्सरीपासून सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना आधारसक्ती करण्यात आली आहे. बहुतांश विद्यार्थ्यांना अद्याप आधारकार्ड नाही. महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या अखत्यारित १०५ शाळा आहे. यात ४४ हजार ६०६ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. त्या अनुषंगाने या विद्यार्थ्यांना आधारकार्ड जमा करावे, अशा सूचना दिल्या होत्या. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून ते आजतागायत दहा हजार ४९५ विद्यार्थ्यांचे आधारकार्ड शाळेत जमा करण्यात आले नाही. ते अद्यापही कार्डविनाच आहे. ७२० विद्यार्थ्यांनी ईआयडी पावती शाळेत जमा केली आहे. अशा विद्यार्थ्यांचे लवकरच आधारकार्ड येईल, असे वाटत असले तरी शहरात मोजकीच केंद्र सुरू आहेत. भरीस भर दैनंदिन केवळ चाळीस अर्ज दिल्या जात असल्याने पालकांसह विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.   

या संदर्भात महापालिका प्रशासनाने विशेष पावले उचलून आधारकार्ड बनविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी पालकांकडून केल्या जात आहे. मध्यंतरी जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार केंद्र काही कारणास्तव बंद करण्यात आले होते. सध्या केवळ महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयात आधार कार्ड काढून दिले जात आहे. केंद्र संख्या कमी असल्याने कित्येक विद्यार्थ्यांच्या आधार कार्डमध्ये नाव, पत्ता, जन्म तारखांमध्ये चुका झाल्याने त्या दुरुस्तीसाठी विद्यार्थी व पालकांची मोठी पंचाईत झाली आहे. 

आधारकार्ड काढण्यासाठी आवश्‍यक असलेले मशीन लवकर उपलब्ध करण्यात येईल. सध्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. मशिन मिळाल्यावर उर्वरित विद्यार्थ्यांना आधारकार्ड मिळेल.
- रजिया खान, पर्यवेक्षिका, महापालिका 

'सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com