Pune : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे (एसएफआय) १८ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन आयोजित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

student

Pune : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे (एसएफआय) १८ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन आयोजित

पुणे : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे (एसएफआय) १८ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने एसएफआयतर्फे १०० किलोमीटर धावत ‘शाळा वाचवा शिक्षण ज्योत’ काढण्यात येणार आहे. तसेच या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंदच्या निर्णयाचा विरोध करण्यात येणार आहे. अशी माहिती एसएफआयच्या वतीने शुक्रवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.

या प्रसंगी एसएफआयचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ निर्मळ, राज्य समिती सदस्य पल्लवी बोरडकर, जिल्हा उपाध्यक्ष अक्षय निर्मळ आणि जिल्हा समितीचे अभिषेक शिंदे उपस्थित होते. यावेळी सोमनाथ म्हणाला, ‘‘राज्य शासनाचा २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंदीच्या निर्णयामुळे असंख्य विद्यार्थ्यांना शिक्षणातून बाहेर काढणारा आहे. यामुळे महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांच्या विचारांचा अपमान केला जात आहे. या एसएफआय तीव्र विरोध करत आहे.

यासाठी भिडेवाडा येथे गुरुवारी सकाळी सात वाजता ही ज्योत पेटविण्यात येणार असून सुमारे १०० किमी अंतर धावत शिवनेरी किल्ल्यावर ही शिक्षण ज्योत विद्यार्थी घेऊन जाणार आहेत. ही ज्योत स.प.महाविद्याल, फर्ग्युसन महाविद्याल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या मार्गाने दापोडी येथे भगतसिंग यांच्या पुतळ्यास अभिवादन करून प्रस्थान करेल.’’एसएफआयचे अधिवेशन १८ ते २० नोव्हेंबर दरम्यान जुन्नर येथे शिवनेरीच्या पायथ्याशी पार पडणार आहे. यामध्ये शिक्षणाशी निगडित विविध गोष्टींची चर्चा केली जाणार आहे. असे यावेळी पल्लवीने सांगितले.