पुणेरी पगडीवरुन विद्यापीठात गदारोळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११४ व्या पदवी प्रदान सोहळ्यात काही विद्यार्थ्यांनी 'कुलगुरू हाय हाय' असा नारा देत सोहळ्यातील पुणेरी पगडीचा जाहिर निषेध केला. 

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११४ व्या पदवी प्रदान सोहळ्यात काही विद्यार्थ्यांनी 'कुलगुरू हाय हाय' असा नारा देत सोहळ्यातील पुणेरी पगडीचा जाहिर निषेध केला. 

विद्यापीठाच्या पदवी प्रदान सोहळ्यात कुलगुरू यांनी बोलण्यास सुरूवात केली. त्यावेळी काही विद्यार्थी संघटनेचे विद्यार्थी सोहळ्याच्या मुख्य मंडपात आले आणि कुलगुरू यांच्या विरोधात नारा देऊ लागले. 'महात्मा फूले जय, सावित्रीबाई फुले जय' अशा घोषणाही विद्यार्थ्यांनी दिल्या. यावेळी त्यांनी 'कुलगुरू यांचा धिक्कार असो' अशा नारा लावला.
काही क्षणात विद्यापीठाच्या सुरक्षा अधिकारऱ्यांनी संबंधित विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. या निषेधामुळे विद्यापीठातील वातावरण काही काळ तापले होते. कुलदीप आंबेकर आणि यासह अन्य विद्यार्थ्यांना अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.

Web Title: students got angry on puneri pagdi in pune university convocation ceremony