औंध मिलिटरी कॅम्प मध्ये विद्यार्थ्यांना सैन्य आणि शस्त्राबाबत मार्गदर्शन 

रमेश मोरे
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

-  स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून येथील औंध मिलिटरी कॅम्प मराठा जंगी पलटण मराठा बटालियनच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना सैन्य आणि शस्त्राबाबत माहिती देण्यात आली.

- औंध मिलिटरी कॅम्प येथे मराठा जंगी पलटण यांच्यावतीने परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आले होते.

जुनी सांगवी : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून येथील औंध मिलिटरी कॅम्प मराठा जंगी पलटण मराठा बटालियनच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना सैन्य आणि शस्त्राबाबत माहिती देण्यात आली. औंध मिलिटरी कॅम्प येथे मराठा जंगी पलटण यांच्यावतीने परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आले होते.

यात सांगवी पिंपळे निलख येथील विद्या विनय निकेतन विद्यालय, पालिकेची शाळा क्रमांक ५२ , बाबूराव घोलप विद्यालय, ईत्यादी शाळांना  सहभागी करून घेण्यात आले. यात विद्यार्थ्यांना सैनिकांकडून सैन्याबद्दल व शस्त्राबद्दल माहिती देण्यात आली. सैन्याचे सिमेवरील व देशांतर्गत आपत्ती नियंत्रण मदत कार्य याबाबत माहीती देण्यात आली. सैन्यात येण्यासाठी त्यासाठी करावी लागणारी शारीरिक, मानसिक तयारी व्यायाम, शिस्त,संयम व यासाठी कराव्या लागणारे शारीरिक परिश्रम आणि परीक्षा त्याची तयारी कशी करावी याबाबत माहिती देण्यात आली.

तर विविध शस्त्रा बाबत विद्यार्थ्यांना शस्त्राची जवळून माहिती करून देण्यात आली.जुन्या व नव्या शस्त्रा बरोबरच आधुनिक रायफल्स, लाईट मशीन गन, मेडीयम मशीन गन, रात्रीच्यावेळी टेहेळणी करण्यासाठी लागणारी दुर्बीण, वायरलेस संदेश, रेडिओ स्टेशन आदी उपकरणे व शस्त्रांची विद्यार्थ्यांना जवळून प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. याच बरोबर काही शाळांमधून सैनिक प्रतिनिधी पाठवून विद्यार्थ्यांना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students got guidance from Military and Armed Forces in Aundh Military Camp

टॅग्स