lunch
lunch

आ. भरणे व सभापती प्रवीण मानेंनी घेतला विद्यार्थ्यांसमवेत जेवणाचा आस्वाद

वालचंदनगर (पुणे) : कळंब (ता.इंदापूर) येथील विश्‍वासराव रणसिंग महाविद्यालयामध्ये आमदार दत्तात्रेय भरणे व पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती प्रवीण माने यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या समवेत भारतीय बैठक घालून जेवनाचा मनमुराद आनंद घेतला.

आमदारांसोबत जेवण करण्याची संधी मिळाल्यामुळे विद्यार्थी ही भारावून गेले. कळंब (ता.इंदापूर) येथील विश्‍वासराव रणसिंग महाविद्यालयामध्ये आज शनिवारी (ता.१७) वार्षिक बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमांचे अायोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला आमदार भरणे व सभापती माने दोघे प्रमुख पाहुण होते.भाषणामध्ये भरणे यांनी कॉलेजमधील आठवणींना उजाळा दिला.

कॉलेजमध्ये असताना स्नेहसमंलेनामधील गाण्यांची आेळी ही गायल्या.‘ गेले ते कॉलेजचे दिवस राहिल्या आठवणी फक्त आठवणी ’ असे सांगून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी गप्पा मारुन ज्या विद्यार्थ्यांवरती जास्त फिश पॉईंन्ट असतात तो विद्यार्थी आयुष्यामध्ये नक्की चमकतो असे सांगितले. प्रवीण माने यांनी ही  कॉलेजच मध्ये असताना वर्गणी करुन चित्रपट पाहायला जात असल्याचे सांगून कॉलेजमधील आठवणींना उजाळा दिला. कार्य्रकमानंतर महाविद्यालयामध्ये सर्वांसाठी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार भरणे व सभापती माने यांच्या भोजनासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली होती. मात्र दोघांनीही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या समवेत जमीनीवर भारतीय बैठक मारून जेवणाचा आस्वाद घेतला. आमदारच आपल्या समवेत जेवन करीत असल्याने विद्यार्थी भारावून गेले.

कार्यक्रमास इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठाण चे सचिव अण्णासाहेब हेगडे, खजिनदार हणमंतराव रणसिंग,विश्‍वस्त शिवाजीराव रणवरे,प्रकाश कदम, वीरसिंह रणसिंग, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजित रणवरे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्तात्रेय फडतरे, रवींद्र रणवरे, भगवान रणसिंग,  दशरथ पोळ,योगेश डोंबाळे,महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.अंकुश आहेर,उपप्राचार्य बबन भापकर,डाॅ.सुहास भैरट उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केसकर व संध्याराणी जामदार यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com