विद्यार्थ्यांसाठी जंक्शन ते इंदापूर बससेवा सुरु

राजकुमार थोरात
मंगळवार, 10 जुलै 2018

इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील विद्यार्थ्यांसाठी जंक्शन -इंदापूर नव्याने बससेवा सुरु करण्यात आली. जंक्शन येथे नंदिकेश्‍वर माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आहे. दोन सत्रामध्ये विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सुरु आहे.

वालचंदनगर : इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील 
विद्यार्थ्यांसाठी जंक्शन -इंदापूर नव्याने बससेवा सुरु करण्यात आली. जंक्शन येथे नंदिकेश्‍वर माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आहे. दोन सत्रामध्ये विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सुरु आहे.

या शाळेमध्ये सुमारे दीड हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील अंथुर्णे, शेळगाव, 54 फाटा, गोताेंडी व निमगाव परिसरातील सुमारे 350 विद्यार्थी एसटी बसने नियमित ये-जा करीत असतात. 

जंक्शनमधून शाळा सुटल्यानंतर जंक्शन येथील बसस्थानकवर विद्यार्थ्यांची गर्दी होत होती. यामुळे मुला-मुलींना शाळेमधून घरी जात असताना नाहक त्रास सहन करावा लागत होता. शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख योगेश कणसे व कर्मयोगी  सहकारी साखर कारखान्याचे संचालक वसंत मोहोळकर यांनी  महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे पुणे कार्यालयाचे सहाय्यक वाहतूक अधीक्षक साळी व इंदापूर आगारचे व्यवस्थापक सर्जेराव येळे यांच्याशी संपर्क साधून जंक्शन  ते इंदापूर बससेवा सुरु करण्याची मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद देऊन साळी व येळे यांनी आज मंगळवार (ता.१०) पासून जंक्शनमधून दुपारी पावणेएक व साडेचार वाजता बस इंदापूरकडे जाण्यासाठी बससेवा सुरु केली.  

बससेवेचा शुभारंभ दुपारी पावणेएक वाजता करण्यात आला. यावेळी चालक अरुण शेवाळे व वाहक प्रशांत जवाहिरे यांचा ग्रामस्थांनी  सत्कार केला. यावेळी नंदिकेश्‍वर विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत सोळसे, आनंदनगरचे उपसरपंच रोहित मोहोळकर, वालचंदनगरचे उपसरपंच संदीप पांढरे, शिवसेनेचे इंदापूर तालुक्याचे युवा सेना प्रमुख सुदर्शन रणवरे, दत्तात्रेय खुडे, लक्ष्मण साळुंके,प्रकाश साळुंके,अॅड.दिपक लोखंडे, दत्तात्रेय साळुंके उपस्थित होते.

Web Title: for Students Junction To Indapur bus service are started