विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे धडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

पुणे - आदर्श शिक्षण मंडळीच्या कर्वे रोडवरील अभिनव पूर्व प्राथमिक मराठी शाळेतील मोठ्या गटातील विद्यार्थ्यांची वाहतूक नियम पालन फेरी काढण्यात आली. वाहतुकीचे नियम चार भिंतीच्या आत न शिकवता मुलांनी प्रत्यक्ष रस्त्यावर जाऊन वाहतुकीचे धडे गिरविले. त्यासाठी मुलांना पादचारी मार्गावरून एसएनडीटी महाविद्यालयासमोरील पादचारी पुलावर नेण्यात आले. 

रस्ता ओलांडताना पादचारी पुलाचा वापर काय करायचा, पार्किंगचे नियम, सिग्नलचे अर्थ, झेब्रा क्रॉसिंग, एकेरी वाहतूक, जवळ शाळा असल्यास हॉर्न न वाजविण्याची खूण, इलेक्‍ट्रिकच्या खांबाला हात लावायचा नाही, अनोळखी वस्तू उचलायची नाही अशा गोष्टी वाहतूक फेरीच्या वेळी सांगितल्या गेल्या.
‘‘वाहतूक फेरी झाल्यानंतर पुलाचा जिना, बस, रिक्षा, नो-पार्किंगचा फलक, सिग्नल आदी चित्रे काढली. त्याचप्रमाणे ‘मुले आता आम्हाला लाल दिवा लागल्यानंतर गाडी थांबवायलाच लावतात,’’ असे पालकांनी सांगितले. 

Web Title: Students, lessons transport rules