विद्यार्थ्यांनी तयार केले रॉकेट, बलून कार, सोलर ओव्हन

राजकुमार थोरात
शुक्रवार, 11 मे 2018

वालचंदनगर (पुणे) : वालचंदनगर (ता.इंदापूर) येथील भारत चिल्ड्रेन्स अॅकॅडमी स्कुलमधील विद्यार्थ्यांना अमेरिकेतील विद्यार्थीनींनी रॉकेट, बलून कार, सोलर ओव्हन बनविण्याचे प्रशिक्षण देवून प्रकल्प तयार करुन घेतले.

वालचंदनगर (पुणे) : वालचंदनगर (ता.इंदापूर) येथील भारत चिल्ड्रेन्स अॅकॅडमी स्कुलमधील विद्यार्थ्यांना अमेरिकेतील विद्यार्थीनींनी रॉकेट, बलून कार, सोलर ओव्हन बनविण्याचे प्रशिक्षण देवून प्रकल्प तयार करुन घेतले.

गेल्या सहा वर्षापासुन अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनी येथील शाळेतील विद्यार्थ्यांना विविध विषयावर प्रशिक्षण देण्यासाठी येत आहे. या वर्षी अमेरिकेतील अॅगा, सिमरन बटर, अॅलीसा ब्लंट, आरथी नदान, रहैदा या पाच विद्यार्थीनींनी ७ मे रोजी आल्या आहेत. त्यांनी पाच दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना मंगळ ग्रहावरती जाण्यासाठी कशा प्रकारे रॉकेट तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन मुलांकडून रॉकेट तयार करुन घेतले. तसेच मंगळ ग्रहावरती प्रवास करण्यासाठी लागणाऱ्या बलून कार, वस्तुंची वाहतुक करण्यासाठी लागणारे झीप लाईन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.  

अन्न शिजविण्यासाठी  लागणारे सोलर ओव्हन तयार करुन घेतले. दुसऱ्या ग्रहावरती जाण्यापूर्वी तेथील तापमान, हवा, पाण्याची अनकुलता तपासणे तसेच नवीन मानवी वसाहतीसाठी लागणाऱ्या सर्व आवश्‍यकतांची पुर्तता करण्यासाठी उद्योजकता विकसित करण्याचे प्रशिक्षण दिले. या शिबिराचे आयोजन वालचंदनगर कंपनीचे अध्यक्ष चकोर दोशी, व्यवस्थापकीय संचालक चिराग दोशी, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी जी.के.पिल्लई व शाळा समितीचे अध्यक्ष धीरज केसकर यांच्या संकल्पनेतुन आयोजन करण्यात आले होते. शिबीर यशस्वी होण्यासाठी शाळेचे प्राचार्य कृष्णदेव क्षीरसागर, पर्यवेक्षक अमोल गोडसे, सतीश सराफ, आरती कुलकर्णी, ज्ञानेश्‍वर जगताप, प्रशांत पाटकळे, अमृता कोळेकर, मिना थोरात, पार्वती बनसोडे यांनी परीश्रम केले.  

अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील विद्यार्थीनींनी भारतीय विद्यार्थ्यांना प्रात्यक्षीकाद्वारे  वैज्ञानिक संकल्पना शिकवल्याने नवीन विषयाचे आकलन होण्यास मोलाची मदत झाली. तसेच दुसऱ्या ग्रहावरती जाण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती मिळाली. यामुळे विद्यार्थ्यांचा इंजिनिअरिंग कडील कल वाढण्यास मदत होणार असल्याचे प्राचार्य कृष्णदेव क्षीरसागर यांनी सांगितले.

Web Title: students made rocket baloon car and solar oven