'आयबीपीएस' परीक्षेला महाराष्ट्रातील विद्यार्थी मुकणार ? 

Students from Maharashtra will miss IBPS exam
Students from Maharashtra will miss IBPS exam

पुणे : द इन्स्टिट्यूट बॅंकिंग पर्सनल सिलेक्‍शन (आयबीपीएस) संस्थेद्वारे देशभरात 2 हजार 557 लिपीकांची पदे भरली जाणार आहेत, पण यासाठी 23 सप्टेंबर पर्यंत पदवी उत्तीर्ण असल्याची गुणपत्रिका सादर करणे आवश्‍यक आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रात पदवीच्या परीक्षाच झालेल्या नसल्याने हजारो विद्यार्थ्यांना ही संधी गमवायची वेळ आली आहे, यासाठी गुणपत्रिका सादर करण्यासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदत द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर यांनाही याचे निवेदन पाठवले आहे. "आयबीपीएस' द्वारे 17 राष्ट्रीयकृत बॅंकांमधील 2 हजार 557 लिपीकांची भरती केली जाणार आहे, ही परीक्षा डिसेंबर महिन्यात परीक्षा होणार आहे. महाराष्ट्रातून दरवर्षी साधारणपणे १ लाख विद्यार्थी ही परीक्षा देतात. 

अंतिम परीक्षेत 23 सप्टेंबर पर्यंत उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका आवश्‍यक आहे. यंदा कोरोनामुळे पदवीच्या अंतिम वर्षाच्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात ऑक्‍टोबर महिन्यात परीक्षा होऊन त्याचा निकाल नोव्हेंबर लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थी नोकरीच्या संधीचा मुकणार आहेत. कोरोनामुळे रोजगार कमी झालेला असताना केवळ एका अटीमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. दोन महिने परीक्षा उशिरा झाल्याने पुढे दोन वर्ष वाट पहावी लागणार आहे.

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी 23 सप्टेंबरपूर्वी पदवी परीक्षा उत्तीर्ण असण्याची अट शिथिल करण्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरावा आणि ही मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत वाढवावी, त्यामुळे पदवीच्या अंतिम परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळेल. तसेच अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 15 दिवसांनी वाढवून द्यावी, मिळवण्यासाठीही प्रयत्न करावेत, अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com